नगर अग्नितांडव : पवारांना वाहनचालकाचा 'तो' धडकी भरविणारा फोन

ahmednagar
ahmednagaresakal
Updated on

अहमदनगर : ऐन दिवाळीत अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये (ahmednagar hospital fire) भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून 10 जणांचा मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर सात जण भाजले गेल्याचं भोसले यांनी सांगितलं आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं यावेळी भोसले यांनी सांगितलं. आगीत मृत्यू झालेले सर्व रुग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान ही घटना कशी घडली...एक थरारक अनुभव...

पवारांना वाहनचालकाचा 'तो' धडकी भरविणारा फोन

आदर्शगाव कृती समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार (popatrao pawar) यांना दिल्ली जायचे असल्याने कोरोना चाचणी करण्यासाठी सकाळी साडे नऊ वाजता जिल्हा शासकीय रुग्णालयात आले होते. पवार ही चाचणी झाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात भेटण्यासाठी गेले होते. त्यांच्याशी गप्पा मारत असतानाच पवारांना वाहन चालकाचा फोन आली की, रुग्णालयास आग लागली आहे.

ahmednagar
अहमदनगर: मुख्यमंत्र्यांकडून आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश

आग लागल्याचे समजताच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, पोपट पवार, जिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टर, परिचारिका आग लागलेल्या विभागाकडे धावले. आग विझविण्याच्या छोट्या बंबांनी ही आग आटोक्‍यात आणली. महापालिका अग्निशामक दलाचे बंबही तात्काळ घटनास्थळी आले. अवघ्या दहा-पंधरा मिनिटांमध्ये आग आटोक्‍यात आणली. या भीषण आगीची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, कोतवाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे, तोफखाना पोलिस तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी बचाव कार्य सुरू केले. सुरक्षितेच्या कारणास्तव या विभाग शेजारील विभागातील रुग्णांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

शॉर्ट सर्किटनं आग लागली?
आयसीयूला आग लागल्याचं समजताच अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने कोल्हापूरवरुन रवाना झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. मृताचा अद्याप आकडा समोर आलेला नाही. प्रत्येक्षात गेल्यानंतर पाहणी करणार असल्याचं ते म्हणाले. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना तातडीने सरकारी मदत दिली जाईल. तसेच याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होईल, असेही पालकमंत्री म्हणाले.

ahmednagar
अनिल देशमुखांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार संग्राम जगताप, माजी मं ती शिवाजीराव कर्डिले, कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते आदींसह विविध राजकीय नेत्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. मयत रुग्णांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.