Ahmednagar : भारत चंद्रावर अन् आम्ही चिखलावर,रस्त्याचे काम रखडल्याच्या निषेधार्थ बोल्हेगावकरांचा ‘रास्ता रोको’

पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या.
Ahmednagar news
Ahmednagar news sakal
Updated on

अहमदनगर - ‘भारत गेला चंद्रावर, आम्ही मात्र चिखलावर’, अशी घोषणाबाजी करत बोल्हेगावच्या नागरिकांनी अहमदनगर- मनमाड महामार्ग रोखून धरला. सात महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी हे रास्तारोको आंदोलन केले. उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे यांनी काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले

बोल्हेगाव येथील गणेश चौकात सर्व महिला व नागरिकांनी एकत्र येवून सकाळी मनमाड महामार्गावर रास्तारोको केला. आंदोलनात स्वयंफूर्तीने महिला, युवक-युवती, सर्वसामान्य नागरिकांसह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महापालिकेच्या वतीने गणेश चौक ते केशव कॉर्नर रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

या कामासाठी रस्ता पूर्ण खोदण्यात आला आहे. त्यामध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. घरापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी महापालिकेत आंदोलने केली, निवेदने दिली तरी देखील रस्त्याचे काम मार्गी लागले नाही.

Ahmednagar news
PM Modi: 'D येणार आणि C जाणार..', 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे पंतप्रधान मोदींचा फॉर्मूला काय आहे? जाणून घ्या

त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी स्वयंस्फुर्तीने रास्तारोको केला. पोलीस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना केल्या. मात्र आंदोलकांनी आयुक्त आल्याशिवाय रस्त्यावरून न हटण्याचा पवित्रा घेतला. अखेर उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे हे आंदोलन स्थळी हजर झाले. त्यांनी रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Ahmednagar news
Vitamin H च्या कमतरतेमुळे शरीरात उरणार नाही एनर्जी, ही लक्षण दिसताच घ्या योग्य आहार

दुपारपासून कामाला सुरूवात

गणेश चौक ते केशव कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर सहा महिन्यांपूर्वी देण्यात आली आहे. साडेतीन कोटी रुपयांचे हे काम आहे. मात्र ठेकेदाराला कामाचे बिल न मिळाल्याने त्याने हे काम थांबवले होते. मात्र आता ठेकेदाराने काम सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. आज दुपारपासूनच कामाला सुरुवात होणार असल्याचे उपायुक्त कुऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

Ahmednagar news
Dr M S Gosawi Death : शिक्षणतज्ज्ञ डॉ. मो. स. गोसावी यांचे निधन; शरद पवारांनी घेतलं अंत्यदर्शन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.