Ahmednagar : जलजीवन योजनेत घोटाळा; टिळक भोस यांचा आरोप

Tilak Bhos
Tilak Bhos
Updated on

श्रीगोंदे : जलजीवन मिशन ही 'पिण्याचे पाणी' या गोंडस नावाखाली होत असणाऱ्या योजनेत मोठा घोटाळा सुरु आहे. मूळात आजपर्यंतच्या ज्या योजना श्रीगोंद्यात झाल्या आहेत त्यातील किती लोक त्यातील पाणी पिण्यासाठी वापरतात याचीच चौकशी व्हावी. आत्ताची योजना ही कार्यकर्ते व ठेकेदार पोसण्यासाठी असल्याचा थेट आरोप बीआरएस पक्षाचे नेते टिळक भोस यांनी केला.

Tilak Bhos
Shiv Sena : 'छापखान्यातून गायब झालेले ८८ हजार कोटी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात वापरले?' राऊतांचा गंभीर आरोप

भोस म्हणाले, तालुक्यातील जवळपास ८० ठिकाणी ही योजना राबवली जात आहे. योजनेचे स्वरुप भलेही चांगले असले तरी त्याचा उपभोग घेण्याचा प्रयत्न नेते व कार्यकर्ते करीत असल्याचे वास्तव आहे. कोट्यावधी रुपये खर्चून होणाऱ्या या योजना गावकऱ्यांना नव्हे तर ठराविक घटकांना विचारात घेवून केली जात आहे. योजनेत वापरले जाणाऱ्या पाईपांसह साहित्यांची तटस्थ समिती नेमून पाहणी केली तर सगळेच सत्य बाहेर येईल.

ज्या ठेकेदारांच्या नावावर योजना आहेत तेच ही कामे करतात का याची माहिती कुणाकडे नाही. अनेक ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या अर्धवट ज्ञान असणारे कार्यकर्ते योजनेच्या कामावर देखरेख करीत आहेत. त्यामुळे पाईपसाठी लागणारी खोली मर्यादीत केली जात आहे. पाण्याचे स्त्रोत, बांधकामाचे साहित्य हे सगळेच तपासण्याची गरज आहे. मात्र नेत्यांना या योजना निवडणूकीसाठी वापरायच्या असल्याने लोकांचे कुणालाही घेणे देणे नाही.

Tilak Bhos
Devendra Fadnavis : आश्चर्य! शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारं ट्वीट फडणवीसांनी डिलिट केलं

या योजना म्हणजे निवडणूक प्रचारासाठीचा मुद्दा म्हणून वापर करण्याचे षडयंत्र सत्ताधारी आखत आहेत. त्यातच अनेक ठिकाणी नेत्यांना कामातील इच्छित 'पोच' झाल्याने कोण कुणाला पाणी पाजतेय याचा मेळ लागत नाही. आर्वी- अनगरे या भीमा नदीकाठच्या गावाची योजना नदीतून केली आहे.

मूळात भीमाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचा अहवाल आहे तरीही ही योजना तेथून का केली. नदीकाठच्या इतर गावांनी मात्र दौंड वरुन योजना केल्या आहेत. हा घोळ नेमका काय आहे याचीही माहिती येत आहे. श्रीगोंद्यासह जिल्ह्यातील या योजनांच्या घोटाळ्यांचे मूळ आपण शोधणार असून लवकरच पुरावे सादर करु असाही इशारा भोस यांनी दिला.

उदघाटनाला आलेल्या नेत्यांना देणार पाणी- भोस

टिळक भोस म्हणाले, श्रीगोंदे शहर, काष्टी या मोठ्या गावांना अशा योजना यापुर्वी झाल्या आहेत. तेथील किती लोक त्या योजनेचे पाणी पितात याची माहिती प्रशासनासह नेत्यांही घ्यावी. या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुटुंबे पिण्याचे पाणी जारचे घेतात. पिण्यासाठी असणारे नळ योजनांचे पाणी नावालाच वापरले जाते. त्यामुळे आता नव्या योजनांचे उदघाटन करायला येणाऱ्या नेत्यांना फित कापुन नव्हे तर जलजीवन योजनेच्या नळातून आलेले पाणी पिण्यासाठी देवून उदघाटन करायला लावणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.