Mission Jivan Rakshak: ‘जीवन रक्षक’ने वाचविले ६६ जणांचे प्राण, ‘ऑपरेशन अमानत’चा ८५७ प्रवाशांना लाभ

मध्य रेल्वेच्या आरपीएफची कामगिरी, ‘ऑपरेशन अमानत’चा ८५७ प्रवाशांना लाभ
Ahmednagar news
Ahmednagar newsesakal
Updated on

अहमदनगर : मध्य रेल्वे आरपीएफच्या ''मिशन जीवन रक्षक''ने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान ६६ लोकांचे प्राण वाचवले. गेल्या सात महिन्यात रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने स्वतःचा जीव धोक्यात घालून ही कामगिरी केली आहे, तर एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, ऑपरेशन ''अमानत'' अंतर्गत, आरपीएफ ने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपयांचे सामान परत मिळवून दिले आहे.

Ahmednagar news
Thyroid Control Tips : थायरॉईडला कंट्रोल करण्यासाठी ‘या’ सोप्या आयुर्वेदिक टीप्सची घ्या मदत

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात. केवळ रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठीच नव्हे, तर जीव वाचवणारे, पळून गेलेल्या मुलांचे रेस्क्युअर्स आणि लगेज रिट्रीव्हर अशा अनेक भूमिका बजावत असतात. एप्रिल-ऑक्टोबर २०२३ या कालावधीत, मध्य रेल्वेच्या आरपीएफ जवानांनी ''मिशन जीवन रक्षक''चा एक भाग म्हणून काही वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून ६६ जणांचे प्राण वाचवले आहेत.

Ahmednagar news
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

आरपीएफच्या सतर्कतेने बहुतेक प्रकरणांमध्ये अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवला आहे. पण सरतेशेवटी, वाचविणाऱ्यांच्या या कृतीचा परिणाम आनंद आणि आरपीएफ जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.

Ahmednagar news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

रेल्वे संरक्षण दलाच्या या सैनिकांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीला अडथळा इत्यादी विविध सुरक्षा आव्हानांनाही तोंड द्यावे लागते. रेल्वे संरक्षण दलाच्या या शूर सैनिकांच्या कार्याचा सारांश सुरक्षा, सतर्कता आणि सेवा असा करता येईल आणि त्यांनी अत्यंत समर्पण सतर्कतेने आणि धैर्याने आपली कर्तव्ये पार पाडली आहेत. मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना, धावत्या ट्रेनमधून चढू नये किंवा उतरू नये, असे आवाहन रेल्वेच्या संरक्षण दलाने केले आहे.

Ahmednagar news
Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

महिलेची पर्स मिळाली

२७ नोव्हेंबर रोजी प्रियांका लोखंडे ही महिला शेगाव ते कोपरगाव प्रवास करीत होती. ही महिला कोपरगावला उतरून गेली. तिची पर्स रेल्वेत विसरून राहिली. अहमदनगर रेल्वे स्थानकावर आरक्षक सचिन नागरगोजे यांच्या नजरेस एका सीटखाली गुलाबी रंगाची पर्स आढळून आली. या पर्समधील एका मोबाईल नंबरवर त्यांनी संपर्क साधला. यावेळी कुसुंबा, ता. जि. जळगाव येथील महिला पती शैलेश लोखंडे यांच्यासह नगरला आली. या पर्समध्ये २४ हजार रुपयांचा ऐवज होता. रेल्वेच्या जवानांनी ही पर्स परत केली. या महिलेने त्यांचे आभार मानले.

Ahmednagar news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

२.७७ कोटींचे सामान परत मिळविले

रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, ''अमानत'' या ऑपरेशनअंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू, प्रवाशांचे दागिने, रोख इ. परत मिळवून दिले आहेत.

एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या चालू आर्थिक वर्षात, ऑपरेशन ''अमानत'' अंतर्गत, आरपीएफने सुमारे ८५७ प्रवाशांचे २.७७ कोटी रुपयांचे सामान परत मिळवून दिले आहे.

विभाग प्रवासी संख्या सामानाचे मूल्य (लाखात)

भुसावळ - १८२ ५०.४५ नागपूर - १६८ ३६.९७ पुणे -५८ १३.९४ सोलापूर -७२ १३.९९

जीव वाचविलेल्यांची विभागवार संख्या

मुंबई विभागात- १९

भुसावळ विभागात -१३

नागपूर विभागात -१४

सोलापूर विभागात -५

पुणे विभागात -१५

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()