Nilesh Lanke: हातात घेतली तुतारी, पण अजून नाही मिळाली उमेदवारी; विखेंविरुद्ध रणशिंग फुंकलेले लंके अजूनही वेटींगवर

लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पुन्हा एकदा फौजफाटा तैनात केला होता. उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर जोरदार प्रचार सुरू केला आहे.
Ahmednagar
Ahmednagar Esakal
Updated on

Ahmednagar Loksabha Nilesh Lanke: लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी पुन्हा एकदा फौजफाटा तैनात केला होता. उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर जोरदार प्रचार सुरू केला आहे. दुसरीकडे त्‍यांना तगडा प्रतिस्‍पर्धी उतरविण्याची महाविकास आघाडीने तयारी केली आहे. त्‍यासाठी पारनेरचे आमदार नीलेश लंके मैदानात उतरले आहेत.

पारनेरचे आमदार नीलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांच्या उमेदवारीचे संकेत आहेत. पण प्रत्यक्ष उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. डॉ. विखे यांची उमेदवारी यापूर्वीच निश्चित मानली जात होती.

त्यादृष्टीने त्यांनी मागील वर्षभरापासून जोरदार तयारी केली होती. लंके यांनीही लोकसभेच्या दृष्टीने तयारी केली आहे. त्यांनी दक्षिणेत विविध प्रश्नांवर आंदोलने करून लोकांचे लक्ष वेधून घेतले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आहेत. तथापि, उमेदवारीसाठी त्यांना शरद पवार यांच्या गटात जावे लागणार आहे. प्रत्यक्ष पक्षांतर झाले नसल्याने त्यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.

२०१९ च्या निवडणुकीत डॉ. विखे यांनी आमदार संग्राम जगताप यांना पराभूत करून बाजी मारली. जगताप यांच्या मतांची आकडेवारी पाहिली, तर डॉ. विखे यांना मोठे आव्हान दिले होते. यावर्षी लंके यांनी उमेदवारी केल्यास ही लढत रंगतदार होणार आहे.

जाहीर उमेदवार

जाहीर उमेदवार ः भारतीय जनता पक्ष (खासदार डॉ. सुजय विखे)

यांचे जाहीर होण्याचे बाकी ः महाविकास आघाडी

२०१९ निवडणुकीत प्रमुख उमेदवारांचे बलाबल

डॉ. सुजय विखे (भाजप)- ७,०४,६६० मते (५८.४३ टक्के)

संग्राम जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस) ४,२३,१८६ मते (३५.९ टक्के)

मतांचा फरक ः २,८१,४७४

२०२४ साठी मतदार

मतदार संख्या ः १९,६७,८४९

पुरुष ः १०,२५,६४५

महिला ः ९,४२,०८९

तृतीयपंथी ः ११५

Ahmednagar
Randeep Hooda: "सिनेमा बनवण्यासाठी घर विकलं"; 'स्वातंत्र्य वीर सावरकर' सिनेमाला प्रपोगंडा म्हणणाऱ्यांना रणदीप हुड्डाचं सडेतोड उत्तर

२०१९ चे मतदार

एकूण मतदार ः १८,३१,५३७

पुरुष ः ९,६०,३९२

स्त्री ः ८,७१,०६५

वाढलेले मतदार

१,३६,३१२

भाजप विरुद्ध मविआ

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर झाला आहे. महाविकास आघाडीने अद्याप जाहीर केला नाही. विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांना पुन्हा भाजपचे तिकीट मिळाले आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून आमदार नीलेश लंके किंवा त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके उमेदवार असू शकतील, अद्याप मात्र यावर शिक्कामोर्तब झाले नाही.

आचारसंहितेचा विकासकामांवर परिणाम

जिल्हा परिषदेचे बजेट मागील आठवड्यात सादर करण्यात आले. तब्बल ५० कोटी रुपयांचे हे बजेट आहे. या बजेटमध्ये शिक्षण विभागाला जास्तीचा निधी देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीला कात्री लावण्यात आली. या कामांचा सकारात्मक परिणाम होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने (उत्तर) राहुरी रूरल हॉस्पिटल, हसनापूर उपकेंद्र ग्रंथालयाची निविदा मागील आठवड्यात काढण्यात आली. या निविदाप्रक्रियेला महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनने आक्षेप घेतला आहे. काही ठेकेदारांसाठी जिल्हा परिषदेने संशयास्पद प्रक्रिया राबविल्याचा या संघटनेचा आरोप आहे. तब्बल आठ कोटी रुपयांची ही निविदा आहे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्त

मोर्चे, मिरवणुकांवर लक्ष ठेवणे

विना परवानगी सभांवर कारवाई

रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर विशेष लक्ष

गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया

Ahmednagar
Shivsena Notice To Advocate Asim Sarode: '२ दिवसात माफी मागा अन्यथा...'; शिवसेना शिंदे गटाकडून ॲड. असिम सरोदेंना नोटीस, काय आहे कारण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.