Ahmednagar: अहमदनगर महापालिकेकडून चार दिवसांत चार कोटींची वसुली, थकबाकीदारांचा वसुलीस प्रतिसाद

महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पुन्हा एकदा ७५ टक्के शास्ती माफीचा निर्णय घेतला आहे.
Ahmednagar Municipal Corporation
Ahmednagar Municipal CorporationSakal
Updated on

Ahmednagar News: महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पुन्हा एकदा ७५ टक्के शास्ती माफीचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला कमी उत्पन्न गटाच्या मालमत्ताधारकांनाच ही सवलत होती. परंतु त्यानंतर आयुक्त जावळे यांनी सरसकट शास्ती माफीचा निर्णय घेतला. त्यामुळे चार दिवसांत एक कोटीपेक्षा अधिक थकबाकी वसुल झाली आहे. शहरातील मालमत्ताधारकांनी महापालिकेचा तब्बल २१३ कोटी रुपयांचा मालमत्ता कर थकवला आहे.

ही थकबाकी वसुल करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आले आहेत. थकबाकीदारांना दिलासा देऊन जास्तीत जास्त वसुली व्हावी, या उद्देशाने आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी निर्णय जाहीर केला आहे. सुरुवातीला ही शास्ती माफी केवळ कमी उत्पन्न गटाच्या मालमत्ताधारकांसाठीच होती.

परंतु त्यानंतर आयुक्त जावळे यांनी सरसकट ७५ टक्के शास्ती माफीचा निर्णय घेतला. शास्ती माफीची ही सवलत ९ डिसेंबरपर्यंतच राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीदारांनी शास्ती माफीचा निर्णय घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. जावळे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

Ahmednagar Municipal Corporation
Telangana Assembly Election Results : "वाट पाहू.."CM शिंदेंच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमीवर क्लीन ड्राइव्ह सुरू, तेलंगणाचे पहिले कल हाती येताच दिली पहिली प्रतिक्रिया

यापूर्वी शंभर टक्के शास्ती माफ केली. मात्र, थकबाकीदारांनी या सवलतीकडे देखील दुर्लक्ष केले. लोकन्यायालयाच्या माध्यमातून नोटिसा पाठवल्या, मालमत्ता जप्त करण्याची मोहीम राबविली, तरी देखील महापालिकेच्या तिजोरीत अपेक्षित थकबाकी जमा जाली नाही.

आता आयुक्त डॉ. जावळे यांनी पुन्हा एकदा ७५ टक्के शास्ती माफीचा थकीत मालमत्ताधारकांसाठी ७५ टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, अन्यथा थकबाकी न भरणाऱ्यांच्या मालमत्ता सील करण्यात येतील.- डॉ. पंकज जावळे, आयुक्त (Latest Marathi News)

Ahmednagar Municipal Corporation
Chhattisgarh Election result: छत्तीसगडमध्ये भाजपचा विजय; वाचा दिवसभरातील घडामोडी

सरसकट माफीचा निर्णय

■ आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी सुरुवातीला कमी उत्पन्न गटाच्या थकबाकीदारांसाठीच ७५ टक्के शास्ती माफीचा निर्णय घेतला होता. परंतु आमदार संग्राम जगताप आणि उपमहापौर गणेश भोसले यांनी सरसकट ७५ टक्के शास्ती माफ करण्याची मागणी केली. त्यानुसार आयुक्त जावळे यांना सरसकट ७५ टक्के शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला. (Latest Marathi News)

Ahmednagar Municipal Corporation
Rajasthan Results : राजस्थानमध्ये १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप विजयी; दिवसभरातील निकालाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.