Police Health: ऐन तारुण्यात पोलिसांना गंभीर आजारांची लक्षणं! आरोग्याने वाजवली धोक्याची घंटा, 'ही' आहेत कारणं

कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक असलेल्या तरुण पोलिसांच्या आरोग्याने धोक्याची घंटा वाजवली आहे. ऐन तारुण्यात प्राणघातक आजारांची लक्षणे दिसून आल्याने राशीनसह कर्जत तालुक्यातील काही पोलिस आणि अधिकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.
Police Health: ऐन तारुण्यात पोलिसांना गंभीर आजारांची लक्षणं! आरोग्याने वाजवली धोक्याची घंटा, 'ही' आहेत कारणं
Updated on

Maharashtra Police Health Issue: कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक असलेल्या तरुण पोलिसांच्या आरोग्याने धोक्याची घंटा वाजवली आहे. ऐन तारुण्यात प्राणघातक आजारांची लक्षणे दिसून आल्याने राशीनसह कर्जत तालुक्यातील काही पोलिस आणि अधिकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उपलब्ध पोलिसांवर दररोज पडणारा कामाचा अतिरिक्त ताण, कामाच्या दगदगीमुळे अवेळी होणारे जेवण, कामानिमित्त होणारे सततचे जागरण, वाढत्या गुन्ह्यांमुळे वाढलेला नित्याचा ताणतणाव, अपुरी झोप आणि विश्रांतीचा असलेल्या प्रचंड अभावामुळे हृदयविकाराचे धक्के, रक्तदाब, ऑक्सिजनची कमतरता, चक्कर येणे, डोकेदुखी, रक्तातील साखर वाढणे, स्मृतिभंश होणे अशा प्राणघातक विविध आजारांची लक्षणे तरुण पोलिसात वाढली आहेत.

अशाच आजारांच्या कारणास्तव तीन पोलिस कर्मचारी आणि एक पोलिस अधिकारी सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्व जण तरुण असून २७ ते ४८ वयाच्या दरम्यानचे आहेत. कर्जत पोलिस ठाण्याअंतर्गत ४८ जणांचा स्टाफ असून त्यातील २२ जण विविध रजेवर आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांवरील ताणतणाव कमी होण्याच्या दृष्टीने आणि आरोग्यप्रश्नी विविध उपाययोजना राबविणे गरजेचे आहे.(Latest Marathi News)

चित्रपटातील पोलिसांप्रमाणे लोकांच्या पोलिसांकडून वाढलेल्या अपेक्षा, कायद्याची बंधने, वरिष्ठांचे प्रेशर, कामातील रोजचा प्रचंड ताणतणाव यामुळे पोलिसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे- सोमनाथ दिवटे, प्रभारी पोलिस निरीक्षक, कर्जत.

पोलिसांनी आपल्या जीवनशैलीनुसार चांगल्या आरोग्यासाठी योग्य आहार व नियमित योगासने-प्राणायाम करावेत. सूर्यनमस्कार हा व्यायाम पोलिसांसाठी उत्तम आहे-डॉ. कृष्णकांत गावंडे,ह्रदयरोग तज्ज्ञ, महालक्ष्मी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राशीन.

Police Health: ऐन तारुण्यात पोलिसांना गंभीर आजारांची लक्षणं! आरोग्याने वाजवली धोक्याची घंटा, 'ही' आहेत कारणं
Prakash Raj : मोदींनी काळाराम मंदिरात केली स्वच्छता, अभिनेता प्रकाश राज यांचा संताप! 'हे असं करणं म्हणजे...'

रजेची कारणे आणि रजेवरील पोलिस

उपनिरीक्षक परीक्षेसाठी रजेवर : ४

उपनिरीक्षक परीक्षेसाठी गैरहजर : २

प्रसूती आणि बालसंगोपन रजेवर : २

आजारपणाच्या रजेवर ६

संलग्न (बदल्या होऊन हजर न झालेले) : ८ (Latest Marathi News)

Police Health: ऐन तारुण्यात पोलिसांना गंभीर आजारांची लक्षणं! आरोग्याने वाजवली धोक्याची घंटा, 'ही' आहेत कारणं
''पंतप्रधानांनीच निश्चित केली होती मिलिंद देवरांच्या राजकीय भविष्याची टायमिंग'', काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.