Nashik-Pune High Speed Train: हायस्पीड लोहमार्ग आराखड्यात बदल नको! सत्यजित तांबे यांचं उपमुख्यमंत्र्यांना साकडं

Nashik Pune Semi High Speed Train Via Sangamner: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड लोहमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Nashik-Pune High Speed Train: हायस्पीड लोहमार्ग आराखड्यात बदल नको! 
सत्यजित तांबे यांचं उपमुख्यमंत्र्यांना साकडं
Updated on

Nashik Pune Semi High Speed Train from Sangamner: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड लोहमार्गाच्या मूळ आराखड्यात बदल करत हा मार्ग संगमनेर तालुक्याऐवजी शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे संगमनेरकरांत असंतोष असून, मूळ आराखड्यात कुठलाही बदल करू नये, असे साकडे आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन घातले.

पुणे-नाशिक या दोन महानगरांना जोडणारा लोहमार्ग महारेलच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा लोहमार्ग संगमनेर तालुक्यातून जाण्याचं नियोजन झालं होतं. त्यामुळे पुण्यातील चाकण, भोसरी आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मुसळगाव या चार औद्योगिक वसाहती जोडल्या जाणार आहेत.

त्यामुळे संगमनेर तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी अधिक प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता होती. तसेच संगमनेरमधील फळे, भाजीपाला, धान्य हा माल थेट महानगरांमध्ये अधिक जलद पोहोचला असता. तब्बल तीन दशकांनी संगमनेर देशाच्या रेल्वेच्या नकाशावर येणार असल्याने आणि त्यामुळे तालुक्यात समृद्धी येणार असल्याने संगमनेरकरांनी या लोहमार्गाचं स्वागत केलं. (Latest Marathi News)

असं असताना अचानक या मार्गात बदल करत तो संगमनेरऐवजी राजगुरूनगरवरून थेट शिर्डीकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने संगमनेरकरांमध्ये असंतोष असल्याची बाब आमदार तांबे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.

Nashik-Pune High Speed Train: हायस्पीड लोहमार्ग आराखड्यात बदल नको! 
सत्यजित तांबे यांचं उपमुख्यमंत्र्यांना साकडं
Joe Root Test : रूटनं भारताविरूद्ध केला मोठा विक्रम, रोहितशीही केली बरोबरी

शिर्डीकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या या आधीच धावत आहेत. स्वेच्छेने शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेची सोय आहे. नाशिक-शिर्डी एकमेकांशी जोडलेले आहेत. मात्र, संगमनेर अद्याप रेल्वेच्या नकाशावर नाही. त्यामुळे आमच्या भागासाठी हा महत्त्वाचा लोहमार्ग आहे. परिणामी राज्य सरकारने मूळ आराखड्यात बदल न करता तो संगमनेरवरूनच न्यावा, अशी मागणी आमदार तांबे यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)

राज्य सरकारने महारेलच्या माध्यमातून सिन्नर व संगमनेर तालुक्यांत भूसंपादनही केले आहे. एकट्या संगमनेरमधून १०३ खरेदीखतांद्वारे थेट शेतकऱ्यांकडून जमिनी खरेदी करण्यात आल्या आहे. त्यामुळे हा लोहमार्ग संगमनेरमधून जावा.- सत्यजित तांबे, आमदार

Nashik-Pune High Speed Train: हायस्पीड लोहमार्ग आराखड्यात बदल नको! 
सत्यजित तांबे यांचं उपमुख्यमंत्र्यांना साकडं
Lok Sabha Election 2024 : लोकसभेसाठी पहिल्यांदाच घरी बसून करता येणार मतदान; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.