Ahmednagar News : पारनेरकरांच्या चिंतेत वाढ,पाणीपुरवठा योजनेचा तलाव खपाटीला,३५ गावांना टँकर

पारनेर शहराला दररोज किमान १२ लाख लिटर पाण्याची गरज भासते.
parner
parner sakal
Updated on

पारनेर - पावसाळा संपत आला तरीही तालुक्यातील बहुतेक सर्वच तलाव कोरडे ठाक आहेत. सप्टेंबर महिना अर्ध्याहून अधिक संपला आहे. मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. तालुक्यातील 35 गावे व 253 वाड्या-वस्त्यांवरील सुमारे 69 हजार 219 लोकसंख्येला 28 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

शहराला साडेचार लाख लिटर पाणी टँकरद्वारे पुरविले जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

तालुक्यातील अनेक गावांत पाणी टंचाई जाणवू लागली आहे. सारेच तलाव कोरडे ठाक आहेत. पिकेही सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यावर दुष्काळाची छाया पसरली आहे. तालुक्यात २८ गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. या शिवाय वाघुंडे, बाबुर्डी, शहाजापूर या गावांचे टँकरचे प्रस्ताव नव्याने प्रांताधिकारी कार्यालयात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर म्हसोबा झाप,

parner
Mumbai News: मुंबई होणार चकाचक; शहर अतिक्रमण मुक्त करण्याचे महापालिकेचे मिशन

टाकळी ढोकेश्वर पुणेवाडी व पळसपूर या गावांनी वाढील टँकर खेपा मिळाव्यात, अशी मागणी केली आहे. ऑगस्ट महिना संपतात आला, तरीही मोठा पाऊस झाला नाही. थोड्या पावसावर केलेली पेर काही ठिकाणी वाया गेली आहे, तर काही ठिकाणी पिकेही आता सुकू लागली आहेत. तालुक्यातील विविध व्यावसाय सुद्धा थंडावले आहेत. लवकरच पाऊस झाला नाही, तर तीव्र पाणी टंचाई तालुक्यात जाणवणार आहे.

parner
Jalna News : जवखेडा पाटीवर अज्ञातांकडून परिवहन महामंडळाच्या बसवर दगडफेक, जाळण्याचा प्रयत्न

पारनेर शहराला दररोज किमान १२ लाख लिटर पाण्याची गरज भासते. सध्या शहरात व वाड्या-वस्त्यांना चार ते पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्यात येतो. या पूर्वी ५० ते ६० मिनिटे पाणी सोडले जात होते. आता ३० ते ४० मिनिटे सोडले जात आहे. पाणी टंचाई असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे.

योगेश मते सभापती, पाणीपुरवठा समिती

parner
Pune News : पुण्यात तीन परवाना निरीक्षक निलंबित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.