अहमदनगर - सर्वसामान्यांना अत्याधुनिक आणि सुरक्षित पद्धतीने घर बांधता येणार आहे. या घरकुलासाठी लागणारे सर्व साहित्य प्रयोगशाळेत तपासून घेता येणार आहे. त्या लॅबची पायाभरणी झाली आहे. मेट्रोसिटीतील ही सुविधा लवकरच नगरकरांच्या दिमतीला येणार आहे.
अशास्त्रीय पद्धतीने बांधकाम केल्यास इमारत कोसळण्याची शक्यता असते. अतिवृष्टी, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीत इमारतींचा पाया खचतो. त्यातून काही इमारती कोसळल्याने जीवित आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होते. हे या लॅबमुळे टाळता येणार आहे. घराच्या बांधकामापूर्वी जमिनीखाली किती खोलीवर खडक आहे (जिओटेक्निकल सॉईल इंव्हेस्टिगेशन) याची तपासणी केली जाते. त्यानुसार पायाची खोदाई निश्चित करता येते. सर्व बांधकाम साहित्य तसेच यांत्रिकी (मेकॅनिकल) आणि धातू (मेटालॉर्जीकल टेस्ट) तपासण्या केल्या जातील.
आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स संघटना आणि पुण्यातील स्ट्राँगटेक लॅबच्या वतीने अहमदनगर-दौंड महामार्गावर व्ही.आर.डी.ई. समोर अरणगाव (ता.नगर) शिवारात ही प्रयोगशाळा उभारली जात आहे. प्रसिद्ध आर्किटेक्ट सतीश गुरव यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.
या होतील तपासण्या
स्ट्रक्चरल ऑडिट, काँक्रिट मिक्स डिझाइन, प्लेट लोड टेस्ट, ई. आर. टी., एन. डी. टी., पाईल मटेरिअल टेस्ट, पाइल डायनामिक टेस्ट, सर्व बांधकाम मटेरियल टेस्ट, सर्व बांधकाम मटेरियल केमिकल टेस्ट, सर्व ॲडमिक्सर टेस्ट, ग्राऊट व मोर्टर टेस्ट, पेविंग ब्लॉक टेस्ट, लाइट वेट ब्लॉक टेस्ट, ब्रिकवरील टेस्ट, बिटुमिन टेस्ट, टाईल्सवरील सर्व टेस्ट, वेल्डिंग टेस्ट, सर्व मेटल टेनसाइल टेस्ट, मेटल हार्ड नेस टेस्ट, सर्व मेटल केमिकल टेस्ट अशा सुमारे तीनशेपेक्षा जास्त टेस्ट लॅबमध्ये उपलब्ध होतील.
बांधकाम क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नागरिक आणि अभियंत्यांना जमीन, साहित्याचा दर्जा लॅबमुळे समजणार आहे. परिणामी दर्जेदार बांधकाम होईल.
- राजाराम पुजारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्ट्राँगटेक लॅब
बांधकाम व्यावसायिकांनी उभारलेल्या बांधकामावर त्याच्या फर्मचा ब्रॅण्ड होत असतो. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक दर्जाला नेहमीच सर्वोच्च महत्व देतात. या लॅबमुळे ग्राहकांना ही आपल्या बांधकाम व्यावसायिकाने वापरलेल्या साहित्याचा दर्जा समजेल. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि ग्राहकांमधील पारदर्शीपणा वाढेल.
- प्रदीप तांदळे, सचिव, आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स संघटना
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.