Ahmednagar News : गेट अंगावर कोसळल्याने विद्यार्थ्याचा अकोलेत मृत्यू

शनिवारी सकाळी शाळा असल्याने पाच ते सहा विद्यार्थी शाळेचे गेट उघडण्यासाठी गेले होते.
ahmednagar
ahmednagarsakal
Updated on

अकोले - अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील अगस्ती माध्यमिक विद्यालयात लोखंडी गेट अंगावर कोसळून दहावीच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ७ वाजता झालेल्या घटनेत पांडुरंग बाळू सदगीर (रा.मुथाळणे, ता.अकोले) याचा मृत्यू झाला, तर बबलू सदगीर हा विद्यार्थी जखमी झाला.

शनिवारी सकाळी शाळा असल्याने पाच ते सहा विद्यार्थी शाळेचे गेट उघडण्यासाठी गेले होते. अचानक गेट कोसळल्याने विद्यार्थी दूर पळाले. पांडुरंग हा पुढे असल्याने गेट त्यांच्या अंगावर कोसळले. डोक्याला मार बसल्याने अंतर्गत रक्तस्रावाने त्याचा जागेवर मृत्यू झाला. पालकांना ही माहिती कळताच घटनास्थळी येऊन हंबरडा फोडला.

विद्यालय प्रशासनाविरोधात वातावरण संतप्त बनले होते. संतप्त ग्रामस्थांचा मोठा जमाव विद्यालयात जमला होता. संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी घटनास्थळी आल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा त्यांनी निर्धार केला. विद्यालयाचे प्रशासन या घटनेस जबाबदार असल्याचा आरोप मुथाळणे ग्रामस्थांनी केला. अकोले पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजय करे यांचे मार्गदर्शनाखाली अजित घुले, प्रदीप बडे, संदीप भोसले यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

ahmednagar
Jalna Water Crisis : पाणीबाणीचे संकट; १६ गावांसह १३ वाड्यांना सध्या २८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

जबाबदारी कुणाची?

शाळेचे गेट उघडण्याचे काम शाळेचे कर्मचारी आणि शिक्षकांचे असते. विद्यार्थी गेट उघडतात मग संबंधित तेथे हजर नव्हते का? या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वांचीच चौकशी होऊन कारवाईची गरज आहे. शिक्षण विभागाने धोकादायक इमारती, शाळा खोल्या, शाळेच्या संरक्षक भिंती, गेट तपासण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.