Ahmednagar News : कांदा काढणीवेळी डोळ्यात उडली माशीची अंडी; मजुरांची अवस्था पाहून अंगावर काटा येईल

सुरुवातीला या मजुरांच्या डोळ्यात जळजळ होत होती, तपासणीनंतर कळलं की....
onion crops
onion cropsesakal
Updated on

नाशिकसह राज्यातल्या विविध भागांमध्ये कांदा पिकाच्या काढणीला सुरुवात झाली आहे. मात्र या काढणीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर भारतात आढळणारी एक प्रकारची कीड महाराष्ट्रातही आढळली असून यामुळे डोळ्यांमध्ये अळ्या होत आहेत.

अहमदनगरमधल्या राहुरी तालुक्यात शेतमजुरांना याचा फटका बसला असून त्यांच्या डोळ्यात अचानक अळ्या आढळल्या आहेत. शेतातील कांदा काढत असताना काही मजुरांच्या डोळ्यात जळजळ होत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या मजुरांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं.

onion crops
Supreme Court : कोर्टाचा १४ विरोधी पक्षांना दणका; ईडी, सीबीआयची ताकद वाढणार?

त्यावेळी या मजुरांच्या डोळ्यात अळी तयार होत असल्याचा प्रकार आढळून आल्याने खळबळ माजली आहे. या प्रकारामुळे शेतात काम करणाऱ्या मजुरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या मजुरांना ग्रामीण रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं होतं. मात्र तिथे उपचार उपलब्ध नसल्याने या मजुरांना खासगी रुग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे.

onion crops
Marathwada : मराठवाड्याला शेतकरी आत्महत्यांचा शाप; फक्त तीन महिन्यांत गाठला उच्चांक

काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, शेतात काम करत असताना या मजुरांच्या डोळ्यात माशीची अंडी उडाली आणि यामुळे त्यांच्या डोळ्यात अळ्या झाल्या आहेत. या प्रकरणानंतर राहुरी कृषी विद्यापीठाच्या पथकाने या जागेची पाहणी केली. मातीसोबत ही अंडी डोळ्यात उडाल्याचं या पथकाच्या निदर्शनास आलं. काढणीच्या वेळी काळजी घेण्याचं आवाहन या पथकाकडून कऱण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.