Ahmednagar : ‘निळवंडे’च्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही; बाळासाहेब थोरात

कोकणगाव येथे डाव्या कालव्याचे जलपूजन
Ahmednagar news
Ahmednagar newsesakal
Updated on

तळेगाव दिघे निळवंडे : धरण हे दुष्काळी भागातील जनतेसाठी बांधले आहे. निळवंडेच्या पाण्यासाठी पिढ्यान पिढ्यांचा मोठा संघर्ष राहिला आहे. अनेक दिवसांच्या कामानंतर पाणी दुष्काळी भागात आल्याचा मोठा आनंद आहे. जनतेच्या समाधानासाठी आपण अविरतपणे काम करीत आहे. निळवंडेच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

Ahmednagar news
Baby Care Tips: बाळाची नखं कापताना लक्षात ठेवा या गोष्टी, येणार नाही अडचण

कोकणगाव (ता. संगमनेर) येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या जलपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, निळवंडे पाट पाणी कृती समितीचे उत्तम घोरपडे, नानासाहेब शेळके, साहेबराव जोंधळे, लक्ष्मण जोंधळे, विठ्ठल पानसरे, सरपंच आशा जोंधळे, उपसरपंच अरुण जोंधळे, प्रतिभा जोंधळे, सोमनाथ जोंधळे, सुखदेव जोंधळे, कारभारी साबळे, अनिल भुसाळ, माउली डेंगळे, तानाजी जोंधळे आदी उपस्थित होते.

Ahmednagar news
Travelling Tips : पीरियड्स दरम्यान प्रवास करताना डॉक्टरांनी दिलेल्या या 6 टिप्स लक्षात ठेवा

थोरात म्हणाले, दुष्काळी भागाला पाणी मिळावे, यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी चिंचोली गुरव येथे पाणी परिषद घेऊन निळवंडे धरणासाठी प्रयत्न केले. विविध मंजुरीनंतर या कामाला सुरुवात झाली. मात्र, १९९९ नंतर कामाला खरी गती दिली. परिश्रम घेत धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. दुष्काळी भागात अनेक गावांना पाणी मिळाले आहे. मात्र, वरचा-खालचा करू नका. आगामी काळात सर्वांना पाणी मिळेल यासाठी प्रस्ताव तयार केला असून, कोणीही पाण्यापासून वंचित राहणार नाही. प्रसंगी आमदार थोरात यांच्या हस्ते निळवंडे डाव्या कालव्याचे जलपूजन करण्यात आले. सुरेश जोंधळे यांनी सूत्रसंचालन केले. अरुण जोंधळे यांनी आभार मानले

Ahmednagar news
Career Tips : नवीन वर्षात घरी बसून करा ‘हे’ कोर्स आणि वाढवा तुमचे उत्पन्न

सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांवर घाव घालणारे आहे. कांद्याचे दर कोसळले आहेत. दुधाचे बाजार ३४ वरून २५ रुपये झाले. अवकाळी पावसामुळे सोयाबीन, कापूस पिके वाया गेली आहेत. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. मात्र, सरकार काहीही करीत नाही.

- बाळासाहेब थोरात, आमदार

निळवंडे धरण व कालव्यांसाठी पाठपुरावा करून हे काम पूर्ण करणारे आमदार बाळासाहेब थोरात हेच खरे जलनायक आहेत. ज्यांनी कधी मदत केली नाही. कामात अडथळे निर्माण केले. कृती समितीच्या सदस्यांवर लाठी हल्ले केले. ते स्वतःला जलनायक म्हणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

- उत्तम घोरपडे, निळवंडे कालवा कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.