Anandachi Shidha Fraud: आनंदाचा शिधा’त गैरव्यवहार! पुरवठा शाखेतील खासगी व्यक्तीकडे पैसे जमा, पाथर्डीतील प्रकार

आनंदाचा शिधा योजनेची रक्कम शासकीय तिजोरीत न भरता अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात काम करीत असलेल्या एका तरुणाने गायब केल्याचा प्रकार पाथर्डीत घडला आहे.
Anandachi Shidha Fraud: आनंदाचा शिधा’त गैरव्यवहार! पुरवठा शाखेतील खासगी व्यक्तीकडे पैसे जमा, पाथर्डीतील प्रकार
Updated on

Anandachi Shidha Fraud: आनंदाचा शिधा योजनेची रक्कम शासकीय तिजोरीत न भरता अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कार्यालयात काम करीत असलेल्या एका तरुणाने गायब केल्याचा प्रकार पाथर्डीत घडला आहे. या प्रकारामुळे लाखोंचा गैरव्यवहार पुढे येण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने पुरवठा शाखेतील सावळा गोंधळ उघडकीस आला आहे.

तालुक्यातील रेशन दुकानदारांना गेल्या चार महिन्यात  आनंदाचा शिधा देण्यात आला. हा शिधा विकल्यानंतर त्याचे पैसे आम्ही पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या विभागात काम करणाऱ्या एका तरुणाकडे दिले. मात्र त्याने ही रक्कम शासकीय कोषागारात भरलीच नसल्याचा आरोप करत रेशन दुकानदारांनी ही रक्कम भरण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे ही रक्कम जमा करा, असे आदेश महसूल प्रशासनाने दुकानदारांना दिले आहेत. त्यामुळे ही रक्कम पुन्हा कशी भरायची, असा प्रश्न दुकानदारांनी व्यक्त केला आहे.

दीपावली, पाडवा व गणपती उत्सव काळात रेशन दुकानदारांना शिध्याचे वाटप केले.  हा शिधा विकल्यानंतर त्याची रक्कम दुकानदारांनी शासकीय कोषागारात भरणे क्रमप्राप्त आहे. मात्र पुरवठा शाखेत कार्यरत असलेल्या  तरुणाकडे रक्कम जमा करावी, असे तोंडी आदेश आम्हाला एका अधिकाऱ्याने दिल्यामुळे शिधा विक्रीतून आलेली रक्कम या तरुणाकडे जमा केली. आता परत पैसे भरणार नाही, असा पवित्रा  दुकानदारांनी घेतला आहे. (Latest Marathi News)

तहसीलदार श्याम वाडकर यांनी रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत ज्यांच्याकडे शिध्याची बाकी आहे, ती जमा करावी, असे आदेश दिले आहेत. या संदर्भात पुरवठा अधिकारी ज्योती अकोलकर, संबंधित अधिकारी संदीप बडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Anandachi Shidha Fraud: आनंदाचा शिधा’त गैरव्यवहार! पुरवठा शाखेतील खासगी व्यक्तीकडे पैसे जमा, पाथर्डीतील प्रकार
वनरक्षक पदासाठी तब्बल 44 हजारांवर अर्ज; कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील 'इतक्या' जागांसाठी भरती

पुरवठा शाखेत कोणीही खासगी व्यक्ती काम करत नाही. रेशन दुकानदारांनी परस्पर कोणाकडे पैसे दिले असतील, तर त्यांनी भरणा केलेले चलन ताब्यात घ्यायला हवे होते. ज्यांच्याकडे पैसे येणे बाकी आहे, त्यांच्याशी आपण चर्चा केली आहे. येत्या १५ दिवसात पैसे भरू, असे आश्वासन त्यांनी आम्हाला दिले आहे. त्यांची कोणी फसवणूक केली असल्यास त्यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा- श्याम वाडकर, तहसीलदार.(Latest Marathi News)

पुरवठा शाखेत आठ वर्षांपासून काम करणाऱ्या तरुणाकडे पैसे द्या, असे पुरवठा शाखेतील अधिकाऱ्यांनी  सांगितल्याने आम्ही त्याच्याकडे पैसे दिले. मी स्वतः फोन- पे वरून दीड लाख रुपये दिले आहे. त्याने जर पैसे भरले नसतील, तर आमचा काय दोष आहे. हा मोठा गैरव्यवहार आहे. वेळ पडल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करू- रवींद्र ऊर्फ पिनू मुळे, रेशन दुकानदार, शिराळ.

Anandachi Shidha Fraud: आनंदाचा शिधा’त गैरव्यवहार! पुरवठा शाखेतील खासगी व्यक्तीकडे पैसे जमा, पाथर्डीतील प्रकार
Ind vs Eng Test : दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला दुहेरी झटका! दोन दिग्गज खेळाडू मालिकेतून बाहेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()