Ahmednagar: विवाहासाठी तरुणीने सोडली नोकरी, ऑफिसमधील माजी सहकाऱ्याने फोन करुन मोडलं लग्न; म्हणाला...

प्रेमसंबंध असल्याचे मेसेज होणाऱ्या नवऱ्याला करुन शहरातील एका तरुणीचे लग्न तिच्याच मित्राने मोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Ahmednagar: विवाहासाठी तरुणीने सोडली नोकरी, ऑफिसमधील माजी सहकाऱ्याने फोन करुन मोडलं लग्न; म्हणाला...
Updated on

Ahmednagar Marriage cancelled Due to Fake Call: प्रेमसंबंध असल्याचे मेसेज होणाऱ्या नवऱ्याला करुन शहरातील एका तरुणीचे लग्न तिच्याच मित्राने मोडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच ठिकाणी नोकरीला असल्याने दोघांमध्ये झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत मैत्रीणीचे जुळलेले लग्न मोडणाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दीपक गणेश चौरे (रा.शेंडी पोखर्डी, ता.जि.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

फिर्यादी तरुणी व दीपकची मैत्री झाली. दीपकने त्याच्या मोबाईलमध्ये तरुणीचे फोटो काढले होते. दरम्यान, तरुणीचे लग्न जुळल्याने तिने नोकरी सोडली. त्यानंतर दीपक याने तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला मेसेज करुन सांगितले की, ‘माझे व तिचे एक वर्षापासून प्रेम आहे, तू लग्न करु नको’, त्यामुळे तरूणीचे लग्न मोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.