Ahmednagar News : पोखरी बाळेश्‍वर ‘आउट ऑफ कव्हरेज’

गाव स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. गावात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थी, शाळा, शेतकरी, नोकरदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
 Pokhari Baleshwar
Pokhari Baleshwar sakal
Updated on

घारगाव : संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील पोखरी बाळेश्वर हे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असणारे गाव स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही मोबाईल नेटवर्कपासून वंचित आहे. गावात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने विद्यार्थी, शाळा, शेतकरी, नोकरदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

पोखरी बाळेश्वर हे गाव डोंगरदऱ्यांत वसलेले आहे. गावची लोकसंख्या अडीच ते तीन हजारांच्या आसपास आहे. यामध्ये वाड्या-वस्त्यांचाही मोठा समावेश आहे. गावातील अनेक जण पोलिस, शिक्षक, वन विभाग अशा विविध खात्यांमध्ये नोकरीस आहेत. मात्र, स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतरही हे गाव मोबाईल सेवेपासून वंचित आहे. शासनाने सुरू केलेल्या ऑनलाइन स्वाध्यायापासून विद्यार्थी दूर राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होऊ लागला आहे.

गावात पहिली ते दहावीपर्यंत शाळा असून, शाळांची ऑनलाइन कामे करण्यासाठी अत्यंत अडचणी येतात. वर्गात कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन साहित्य वापरता येत नाही. सर्व प्रकारची डिजिटल साधने उपलब्ध असताना नेटवर्कअभावी त्यांचा वापर करता येत नाही.

 Pokhari Baleshwar
Ahmednagar Crime : ‘ताबेमारी’ची गुन्हेगारी फोफावली

शेतकऱ्यांना शासकीय आदेशाने शेतीची पीकपाहणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागत असल्याने, ती पीकपाहणी कोणत्याही शेतकऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे विविध अनुदाने, योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

गावात पूर्वी सेंट्रल बँकेचे वक्रांगी केंद्र होते, परंतु नेटवर्कअभावी हे केंद्र बंद करण्याची वेळ बँकेवर आली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय संगणकाने जोडले गेले आहे. ग्रामपंचायतीची कामे संगणकीय झाली असली, तरी नेटवर्क नसल्याने कार्यालयीन कामकाजात अडथळे येतात. मोबाईल नेटवर्क मनोरा गावात व्हावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

 Pokhari Baleshwar
Ahmednagar News : दलालांशिवाय होईनात कामे

पोखरी बाळेश्वर गावात मोबाईल नेटवर्क मनोरा व्हावा म्हणून लोकप्रतिनिधींना वारंवार भेटून पत्रही दिले आहे. मात्र, आजपर्यंत आमच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. मोबाईल नेटवर्क नसल्याने आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात मोबाईल नेटवर्क मनोरा होण्यासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागणार?

- सुनील काळे, सरपंच, पोखरी बाळेश्वर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.