अहमदनगर : हॉस्पिटल, मंगल कार्यालय, मंदिरे अशा गर्दीच्या ठिकाणाहून दुचाकी चोरी करून त्या ओळखीच्या लोकांना विक्री करणाऱ्या राहुरी तालुक्यातील दोघांना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले. बाबासाहेब ज्ञानदेव खाडे (रा. लाख पढेगाव, ता. राहुरी), अरुण सुधाकर जाधव (रा. टाकळीमियाँ, ता. राहुरी) अशी जेरबंद केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांच्या ताब्यातून १५ लाख रुपये किमतीच्या २९ दुचाकीच्या हस्तगत केल्या आहेत.