Ahmednagar History Sheeters: अहमदनगरमध्ये ६३९ हिस्ट्रीशिटर, ६८ टोळ्या अजूनही सक्रिय; प्रोफेशनल गुन्हेगारांची संख्या ६७०

जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तब्बल ६३९ गुन्हेगारांचे ‘हिस्ट्रीशिट’ तयार केले आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्या ६८ सराईत टोळ्यांचा समावेश यामध्ये आहे.
Ahmednagar History Sheeters: अहमदनगरमध्ये ६३९ हिस्ट्रीशिटर, ६८ टोळ्या अजूनही सक्रिय; प्रोफेशनल गुन्हेगारांची संख्या ६७०
Updated on

Ahmednagar 68 Gangs are Active : जिल्ह्यात वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असणाऱ्या तब्बल ६३९ गुन्हेगारांचे ‘हिस्ट्रीशिट’ तयार केले आहे. गंभीर गुन्हे करणाऱ्या ६८ सराईत टोळ्यांचा समावेश यामध्ये आहे. कट रचून सराईतपणे गुन्हे करणारे ६७० प्रोफेशनल गुन्हेगार सक्रिय आहेत.

कोणताही गुन्हा केल्यास संबंधित व्यक्तीचे रेकॉर्ड तयार होत असते. त्यातच वारंवार गुन्हे करणारे, परिसरात दहशत निर्माण करणारे, सभा, मोर्चे आदी ठिकाणी प्रक्षोभक भाषणे करून कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे अशांवर पोलिसांचे विशेष लक्ष असते. सततच्या गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांची माहिती पोलिस दरवर्षी गोळा करतात.

पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या क्राईम कॉन्फरन्समध्ये गुन्हेगारांवर वचक रहावा यासाठी सराईत आरोपींचा समावेश हिस्ट्रीशिटरच्या यादीत केला जातो. हिस्ट्रीशीट तयार करण्याचे अधिकार पोलिस अधीक्षक यांना असतात. एखाद्या आरोपीचे हिस्ट्रीशीट तयार झाल्यानंतर त्याच्यावर पोलिसांकडून विशेष देखरेख ठेवली जाते.(Latest Marathi News)

निवडणूक, धार्मिक कार्यक्रमांवेळी हिस्ट्रीशीट असलेल्या गुन्हेगारांना पोलिसांकडून नोटिसा पाठवून समज दिली जात असते. एकदा हिस्ट्रीशीट तयार झाल्यानंतर संबंधित व्यक्ती मृत झाल्यानंतरच हिस्ट्रीशीट रद्द होते.

हिस्ट्रीशीट कोणाचे तयार होते?

पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हेगारी कृत्ये करणारे, दहशत पसरविणारे, क्राईम रेकॉर्ड असणाऱ्या आरोपींचे हिस्ट्रीशीट तयार करण्यात येते. आरोपीचे हिस्ट्रीशीट मंजूर करण्यासाठी पोलिस ठाण्याकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रस्ताव जातो. पोलिस अधीक्षक यांच्याकडून प्रस्ताव मंजूर होतो. विशेष म्हणजे राजकीय पार्श्र्वभूमी असलेल्या काहींचा हिस्ट्रीशीटमध्ये समावेश आहे.

Ahmednagar History Sheeters: अहमदनगरमध्ये ६३९ हिस्ट्रीशिटर, ६८ टोळ्या अजूनही सक्रिय; प्रोफेशनल गुन्हेगारांची संख्या ६७०
Fighter Twitter Review: असा अनुभव होणे नाही! हृतिक-दीपिकाचा 'फायटर' नेटकऱ्यांना कसा वाटला?

वर्षभरात १०१ गुन्हेगार, ४१ टोळ्या

दरवर्षी घडलेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करून कोणत्या गुन्हेगारांचा टोळी, हिस्ट्रीशीटमध्ये समावेश करायचा यावर निर्णय घेतला जातो. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्या ३१ जणांचे हिस्ट्रीशीट तयार करण्यात आले, तसेच ४१ सराईत टोळ्या व ७५ प्रोफेशनल आरोपींची गुन्हेगारी विश्र्वात भर पडली आहे. (Latest Marathi News)

वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींचे हिस्ट्रीशीट तयार करण्यात येत असते. हिस्ट्रीशीट असलेल्या आरोपींवर विशेष लक्ष ठेवले जाते- दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नगर

गुन्हेगारांची कुंडली तयार

६३९

हिस्ट्रीशिटर्स

६८

सराईत टोळ्या

६७०

प्रोफेशनल गुन्हेगार

Ahmednagar History Sheeters: अहमदनगरमध्ये ६३९ हिस्ट्रीशिटर, ६८ टोळ्या अजूनही सक्रिय; प्रोफेशनल गुन्हेगारांची संख्या ६७०
Share Market Opening: शेअर बाजार पुन्हा घसरला; सेन्सेक्स 150 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वधारले?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.