Ahmednagar Politics : राष्ट्रवादीच लढवणार; लोकसभेसाठी पवार, तनपुरे, ढाकणे, फाळकेंचा आग्रह

त्यामुळे मी पक्ष सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहे; त्यांचा आणि माझा संवाद सुरू आहे.
ncp flag
ncp flag sakal;
Updated on

अहमदनगर - नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची मोठी ताकद आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली, तरी तो निवडून येईल. आमदार रोहित पवार, प्रताप ढाकणे, राजेंद्र फाळके यांच्यासह माझ्याही नावाचा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) जिल्ह्याचे प्रभारी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीची बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यावेळी पक्षातील कार्यकर्त्यांनी भूमिका मांडल्याची माहिती तनपुरे यांनी दिली.

तनपुरे म्हणाले, की मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागा पक्षाने जिंकल्या होत्या. त्यातील दोन जागांवर निसटता पराभव झाला होता. नेवाशात अपक्ष शंकरराव गडाख यांना पाठिंबा दिला होता. यावरून नगर जिल्हा पक्षाला मानणारा आहे. चार आमदार अजितदादा गटासोबत गेले असले, तरी ताकद कमी झाली नाही. त्यांच्या जागांवर सक्षम पर्याय आहेत.

नगर जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी पक्ष सोडून गेलेल्या लोकप्रतिनिधींच्या संपर्कात आहे. त्यांचा आणि माझा संवाद सुरू आहे. शेवटी आम्ही राष्ट्रवादी कुटुंबातील आहोत. त्यामुळे नाते आहे. त्यांच्यावर दबाव आहे, हे सर्वांना माहिती आहे. परंतु त्यांनीही द्विधा मनस्थिती सोडून लवकर परतावे, असेही ते म्हणाले.

ncp flag
Ahmednagar : ‘मनपा’ने थकविले २३२ कोटींचे वीजबिल; वसुलीसाठी नोटीस; पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा

खासदार संसदेत दिसले नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कांद्यासह अनेक प्रश्न आहेत. राष्ट्रीय महामार्गांची अवस्था दयनीय आहे. आमच्याच लोकप्रतिनिधींनी उपोषण केल्यावर कल्याण महामार्गाचा प्रश्न मार्गी लागला. या मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांत कधीच आवाज उठवला नाही, अशी टीकाही तनपुरे यांनी खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव न घेता केली.

मी विधानसभेलाच बरा माझ्या नावाचा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला, हे खरे आहे. परंतु मी विधानसभेलाच इच्छुक आहे. मी गेल्या पाच वर्षांत अनेक कामे केली आहेत. तो अनुभव यावेळी नक्कीच कामी येईल. परंतु मी कितीही काहीही म्हणालो, तरी पक्षाने दिलेला निर्णय मला मान्य असेल, असेही तनपुरे यांनी स्पष्टपणे सांगितले. लंकेंनी लवकर निर्णय घ्यावा अजूनही काही लोकप्रतिनिधींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यांना पक्षात परत यायचे आहे.

ncp flag
Ahmednagar : मंजूर दोन कोटींच्‍या कामांचा; तपासच लागेना, स्थायीच्‍या सभेत तत्काळ माहितीसाठी आग्रह

लोकसभेसाठी आमदार नीलेश लंके यांच्या नावाची चर्चा झाली. त्यांनी लवकरात लवकर भूमिका घेतली पाहिजे, तरच त्यांना संधी द्यावी; अन्यथा दुसरे पर्याय आहेतच, अशी कार्यकर्त्यांनी मते मांडली. लंके हेही साहेबांविषयी वेळोवेळी भावना व्यक्त करीत असतात. त्यांनीच आता लवकर निर्णय घ्यावा, असा सूर बैठकीत निघाल्याचे तनपुरे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.