नवी दिल्ली : अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास राज्य शासनानं मंजुरी दिली आहे, पण अद्याप ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. पण तत्पूर्वीच अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याला मात्र रेल्वे मंत्र्यांनी मंजूर दिली आहे. .PPF: पीपीएफच्या नियमांमध्ये सरकारने केला बदल; 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवीन नियम, काय बदल होणार?.रेल्वे मंत्र्यांनी नेमंक काय म्हटलं?रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या नामांतराची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, अहमदनगर रेल्वे स्टेशनचं नवं नाव आता अहिल्यानगर करण्यास मंजुरी देण्यात येत आहे. रेल्वे मंत्रालयानं याला मंजुरी दिल्यानं आता लवकरच अहमदनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डवर अहिल्यानगर असा बोर्ड झळकलेला दिसेल..Badlapur School Crime: शाळेच्या संस्थाचालकासह मुख्याध्यापक अद्यापही फरारच; हायकोर्टानं पोलिसांना झापलं!.अहमदनगरचा इतिहास!पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वारं म्हणजे अहमदनगर जिल्हा. या जिल्ह्याला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. निजामशहानं वसवलेलं अहमदनगर हे शहर निजामशाहीची राजधानीही होतं. या शहराची त्याकाळी कैरो, बगदाद या श्रीमंत शहरांशी तुलना केली जायची.इ.स. १४८६ मध्ये मलिक अहमद हा निजामशाह बहामनी राज्याच्या ‘पंतप्रधानपदी बसला. पंधराव्या शतकाच्या शेवटी म्हणजे इ.स. १४८६ मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजाम शहाने इ.स. १४९० मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले..Badlapur School Crime: पोक्सोचा गुन्हा असूनही सहा दिवसांपासून संस्थाचालक फरार, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी .अहिल्यानगर असं नामांतर का?भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम राज्यकर्त्यांनी दिलेली शहरांची नावं बदलण्याचा सत्ताधारी पक्षाचा राजकीय अजेंडा आहे. त्यानुसार आत्तापर्यंत अनेक शहारांची नावं बदलण्यात आली आहेत. त्यात अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश आहे. पण याच अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. त्या इंदूरच्या मल्हारराव होळकर यांच्या सून. मल्हाररावानंतर अहिल्यादेवी यांनी जवळपास २८ वर्षे माळवा राज्याच्या महाराणी म्हणून राज्य चालवलं. या काळात त्यांनी देशभरात धर्मशाळा, मंदिरे, विहिरी, बारवं, अनेक अन्नछत्रे उघडली. त्यामुळं अशा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाचं नाव या जिल्ह्याला देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं घेतला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.