Ahmednagar : काळ्या कातळावरून कोसळणारा रंधा धबधबा लुप्त

भंडारदरा परिसरातील रंधा धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण
Ahmednagar news
Ahmednagar newsesakal
Updated on

अकोले : भंडारदरा परिसरातील रंधा धबधबा हा पर्यटकांचे आकर्षण. दरवर्षी हा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र, निळवंडे जलाशयाच्या बॅक वॉटरमुळे हे पाणी रंधा धबधब्याजवळ येऊन पोहोचल्याने उंच कड्यावरून कोसळणारा धबधबा लुप्त झाला आहे. त्यामुळे पर्यटक व निसर्गप्रेमींतून नाराजी व्यक्त होत आहे.

Ahmednagar news
Hair Care Tips : कोरड्या आणि फ्रिझी केसांना मऊ बनवायचे आहे? मग, ‘या’ टीप्सची घ्या मदत

भंडारदरा परिसरात असलेला रंधा धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. १७० फूट खोल काळ्या कातळावरून पांढऱ्या शुभ्र धारा वाहताना पाहून पर्यटक धन्य पावलो म्हणत तासनतास हा धबधबा पाहण्याचा आनंद घेतात. मात्र, निळवंडे जलाशयाच्या बॅक वॉटरमुळे हा धबधबा लुप्त होताना दिसत आहे.

Ahmednagar news
Makeup Tips : हिवाळ्यातला मेकअप म्हणजे चेहऱ्याला पिठ लावल्यासारखंच दिसतं? या स्टेप्सनी मिळवा मेकअपचा खरा ग्लो!

निळवंडे जलाशय ६४८ तलांकापर्यंत भरल्यामुळे हे पाणी रंधा धबधब्याच्या पायथ्याशी आले आहे. रंधा धबधब्याचा कोसळणारा दुसरा टप्पा पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे हे पाणी स्थिर झाल्यामुळे धबधबा लोप पावला आहे. पर्यटक मोठ्या प्रमाणात हा दुसरा टप्पा पाहण्यासाठी आवर्जून रंधा धबधब्याजवळ गर्दी करतात. तेथे आपल्या कुटुंबासह फोटो, सेल्फी काढून आपला आनंद द्विगुणित करतात. मात्र, हा धबधबा लोप पावणार असून, यापुढे धबधबा पाहण्याची क्वचितच संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पर्यटक व निसर्गप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Ahmednagar news
Investment Tips सोन्यात गुंतवणूक म्हणजे दागिने खरेदी नव्हे!

चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात...

मी हो बसते तपाला,

माय सांगते प्रवरा

लुप्त होणार हो आहे

रंध्याचा हा शुभ्र झरा

धरणाच्या भिंतीवर,

रोज आपटून डोकं

मला वाहू द्या रे आता

किती तहानलेले लोक…

Ahmednagar news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

निळवंडे जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे निळवंडे बॅक वॉटर रंधा धबधब्याच्या पायथ्यापर्यंत स्थिरावणार असल्यामुळे रंधा धबधब्याचा दुसरा कोसळणारा फॉल बंद होणार आहे. धरणाच्या ६४८ तलांकापर्यंत पाणी असल्यामुळं हा धबधबा लोप पावेल. मात्र, १५२० फूट पाणी खाली गेल्यास काही प्रमाणात दिसू शकतो.

-प्रदीप हापसे, कार्यकारी अभियंता, निळवंडे प्रकल्प

धबधब्याच्या वरील बाजूस उन्नयी बंधारा बांधण्यात आला असून, वीज प्रकल्प दोनसाठी पाणी वळविण्यात येऊन त्यापासून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. वीजनिर्मितीनंतर हे पाणी धबधब्याकडे न जाता कालव्यातून थेट कृष्णावंती पात्रात सोडण्यात येते. अगोदरच हा धबधबा कमी प्रमाणात वाहत असताना अलीकडे बॅक वॉटरमुळे हा धबधबा अवतीर्ण होणार नसल्याने दुःख होत आहे. जलसंपदा विभागाने याबाबत पावले उचलावीत.

- विनायक वाडेकर, निसर्गप्रेमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.