अहमदनगर : राज्य शासनाने महात्मा फुले योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सन २०१७-१८, २०१८-१९ व सन २०१९-२० या कालावधीत नियमीत परतफेड केलेल्या शेतकरी सभासदांना ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणे विषयी जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार आज शेतकऱ्यांच्या खात्यात ९० कोटी ९३ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे, अशी माहिती बॅंकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे यांनी दिली.
या योजनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शेतकरी सभासदांचा १ लाख ७७ हजार २६९ कर्ज खात्याची माहिती शासकीय लेखापरिक्षकांकडून तपासणी करून शासन पोर्टलवर अपलोड केलेली आहे. या माहितीचे शासनस्तरावर संगणकीय संस्करण होऊन पात्र शेतकरी सभासदांपैकी ३२ हजार ६०१ शेतकरी सभासदांची पहिली यादी शासन पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करण्याबाबत १२ आक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली असून, जिल्ह्यातील ३१ हजार ९२० शेतकरी सभासदांनी आधार प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा सहकारी बँकेचे कर्जदार सभासद असून, बँकेचे शेती विकासासाठी जिल्ह्यात सिंहाचा वाटा आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील २५ हजार ४१८ कर्जदार शेतकरी सभासदांना जिल्हा बँकेच्या त्यांच्या खाती रक्कम ९० कोटी ९३ लाख प्रोत्साहनपर लाभाची रक्कम जमा झाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी सांगितले.
आधार प्रामाणिकरण करावे
सन २०२२-२३ सालात बँकेने खरीप हंगामात ३ लाख ६४ हजार ६९९ शेतकऱ्यांना रक्कम २७१६.५६ कोटीचे अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. तसेच प्रोत्साहनपर लाभ योजनेतील उर्वरित ६४४ शेतकरी सभासदांना आधार प्रमाणिकरण प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे जिल्हा बॅंकेच्या वतीने सांगण्त आले.
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान मिळावे, यासाठी आधार प्रामाणीकरण बॅंकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात आले. त्यामुळे पहिल्या टप्प्यात नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जास्त समावेश आहे. वेळेत रक्कम मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळेल.
- ॲड. माधवराव कानवडे,उपाध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.