Ahmednagar : सरपंच पाहिजे तर अशा! चक्क गावात फुलवले मियावाकी जंगल

Ahmednagar
Ahmednagar
Updated on

घारगाव - संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील लोकनियुक्त सरपंच अर्चना नितीन आहेर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मियावाकी जंगल फुलविले आहे. यामुळे गावठाणचा परिसर हिरवागार दिसत असल्याने जणू नंदनवन फुलल्याची अनुभूती मिळत आहे.

Ahmednagar
Mumbai : एसटीचे बस स्थानक खड्डेमुक्त घोषणेची पोलखोल; मुख्यालयातील सेंट्रल स्थानकात खड्डेच खड्डे

संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या पुढाकारातून हा मियावाकी जंगल प्रकल्प प्रत्येक ग्रामपंचायतीने राबवला आहे. याच धर्तीवर घारगाव येथील स्मशानभूमीजवळ असलेल्या एक गुंठा मोकळ्या जागेत सरपंच अर्चना आहेर यांनी हा प्रकल्प राबवण्याचा ठरवले होते.

त्यानुसार जागा सपाट करण्यात आली आणि काही महिन्यांपूर्वी या जागेत वड, पिंपळ, लिंब आदी प्राणवायू देणारी झाडे लावण्यात आली होती. मात्र आज ही सर्व झाडे मोठ्या डौलाने फुलली असून अनेकजण मियावाकी जंगल पाहण्यासाठी भेटी देत आहेत.

Ahmednagar
Sudhir Mungantiwar: नावावरून सरकारमध्ये वाद नाही, फडणवीसांच्या आग्रहाखातर दिलं अटलजींचं नाव

सध्या मियावाकी जंगलामधील सर्व झाडे हे लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. विशेष बाब म्हणजे अर्चना आहेर व त्यांचे पती नितीन आहेर यांनी स्वतः या सर्व झाडांची चांगली देखभाल केल्याने हे मियावाकी जंगल फुलले आहे. जागतिक तापमान वाढ कमी करण्यासाठी मियावाकी जंगल हा प्रकल्प राबविण्यात आला आहे.

त्या माध्यमातून तापमान कमी होईल त्या मागचा हा उद्देश आहे. त्याचबरोबर गावातील स्मशानभूमीतही विविध प्राणवायू देणारी झाडे लावण्यात आली आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य बनला आहे.

एक महिला सरपंच काय करू शकते हे खर्‍या अर्थाने घारगाव येथील सरपंच अर्चना आहेर यांनी दाखवून दिले आहे. विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी आज गावासह वाड्या-वस्त्यांचा कायापालट केला आहे. कधी न सुटणारे रस्त्यांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहेत. त्यामुळे आदर्श सरपंच म्हणून त्यांची सर्वत्र वेगळी ओळख निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.