Nagar BJP News: भाजपचा 'हा' जेष्ठ नेता पोलिसांच्या ताब्यात, एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारवाई

याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल झालेला.
Nagar BJP News
Nagar BJP NewsSakal
Updated on

Ahmedabad Nagar- शहरातील भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांना बुधवारी (ता. २६) मध्यरात्री सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. सातारा जिल्ह्यातील शरयू साखर कारखान्याची एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लोढा यांच्याविरुद्ध लोणंद येथे गुन्हा दाखल आहे. त्यांना रात्री राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले.

Nagar BJP News
Mumbai Rain news:अंधेरीच्या सबवेमध्ये मुसळधार पावसामुळे साचलं पाणी, पोलीस सहआयुक्तांनी स्वत: मैदानात उतरुन घेतला आढावा

सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील कापशी येथील शरयू अॅग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याची सुमारे एक कोटी चौदा लाख रुपयांची फसवणूक झालेली आहे. यात वसंत लोढा यांच्यासह एक ठेकेदार, तसेच शरयू इंडस्ट्रीज लि.चे तीन अभियंते सहभागी आहेत.

याप्रकरणी लोणंद पोलिस ठाण्यात लोढा यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. याप्रकरणी कारखान्याचे संचालक अविनाश शिवाजी भापकर यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शरयू कारखान्यामध्ये इंजिनिअरिंगच्या विविध प्रकारच्या कामांचा २०२१ मध्ये करार झाला होता. फॅब्रिक्स इंडस्ट्रीजतर्फे वसंत लोढा व ॲक्युरेट इंजिनिअरिंग ॲण्ड इरेक्शन यांच्यातर्फे प्रसाद अण्णा यांच्यासोबत हा करार करण्यात आला होता.

Nagar BJP News
Mumbai Rain news:अंधेरीच्या सबवेमध्ये मुसळधार पावसामुळे साचलं पाणी, पोलीस सहआयुक्तांनी स्वत: मैदानात उतरुन घेतला आढावा

करारावेळी कोटेशनबरोबर वरील दोघांनी, त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांतील शासकीय, निमशासकीय व खासगी क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असल्याबाबतचे शासनाचे शिक्के व सह्या असलेले दाखले जोडलेले होते. वर्क ऑर्डर दिल्यानंतर लोढा व प्रसाद अण्णा यांना मोठी रक्कम अदा करण्यात आली होती.

त्यांनी कंपनीच्या वर्क ऑर्डरप्रमाणे काम केले नाही, तसेच कामास टाळाटाळ केली. त्यावेळी वसंत लोढा व प्रसाद अण्णा यांनी दिलेली कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे समोर आले. या दोघांनीही राज्य सरकार व वेगवेगळ्या सरकारी, निमसरकारी, कंपन्यांचे खोटे दाखले व सही-शिक्के तयार करुण त्यांचा दुरुपयोग व फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटलेले आहे.

Nagar BJP News
Mumbai Rain Update : मुंबईत पावसाची दमदार हजेरी! रस्ते वाहतुकीला ब्रेक, विमान सेवांना लेटमार्क

पैसे देण्यास नकार

लोढा व प्रसाद अण्णा यांनी कंपनीची एक कोटी १४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. ही रक्कम परत देण्याची मागणी कंपनीने त्यांच्याकडे वेळोवेळी केली; परंतु त्यांनी रक्कम परत केली नाही. अखेर कंपनीने या सर्वांविरुद्ध लोणंद पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.