सोनई : पहिल्या श्रावणी शनिवारनिमित्त आज दोन लाखांहून अधिक भक्तांनी शनिशिंगणापूरला भेट देऊन शनिमूर्तीचे दर्शन घेतले. पहाटे पाच ते सात या वेळेत तीन हजार युवकांनी जलाभिषेक केला. देवस्थानने यासाठी स्वतंत्र स्नान व जलपात्राची व्यवस्था केली होती.
श्रावण महिन्यासाठी देवस्थान ट्रस्टने देवाला पाणी घालण्यासाठी पहाटे पाच ते सात या वेळेत परवानगी दिल्याने, आज चौथ-यावर परिसरातील युवक व भाविकांची झुंबड उडाली होती. दोन तासांत तीन हजार भक्तांनी ओल्या वस्त्राने जलाभिषेक केला. मुख्य पुरोहित अशोक कुलकर्णी यांच्या हस्ते आरती सोहळा झाला.
घोडेगाव, चांदे, कांगोणी, शिरेगाव, लोहगाव, ब्राह्मणी, उंबरे येथील हजारो भाविक पायी दिंडीने दर्शनासाठी आल्याने रस्ते गर्दीने फुलले होते.श्रावणाची पर्वणी लक्षात घेऊन देवस्थानच्या वतीने पिण्याचे पाणी, स्नानाची व्यवस्था, आरोग्यसेवा, प्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. अध्यक्ष भागवत बानकर व विश्वस्त मंदिरात थांबून होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.