तर... आमदारकीला कर्डीलेही ठोकणार श्रीगोंद्यातून शड्डू

विधानसभा लढण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. अनेकांना आमदार होण्याची इच्छा असल्याने श्रीगोंदे तालुक्यात उमेदवार वाढण्याची चिन्हे आहेत.
shivaji kardile
shivaji kardilesakal
Updated on

श्रीगोंदे : विधानसभा लढण्यासाठी अनेकांनी बाशिंग बांधले आहे. अनेकांना आमदार होण्याची इच्छा असल्याने श्रीगोंदे तालुक्यात उमेदवार वाढण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास नगर तालुक्यातील पाऊण लाख मतदारांमधूनही आमदार होवू शकतो ही चर्चाही पुढे आली आहे. राजकीय पुर्नवसनपासून लांब राहिलेले माजीमंत्री शिवाजी कर्डीले हेही श्रीगोंद्यातून विधानसभा लढण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशिर माहिती आहे. 'व्याह्यां'ची मदत घेवून आमदार होवू शकतो का याची चाचपणी सुरु झाल्याची माहिती आहे.

श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघात आमदार बबनराव पाचपुते यांचे राजकीय वर्चस्व संपविण्यासाठी दिवंगत शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप व प्रा. तुकाराम दरेकर यांनी एकास एक लढतीचा केलेला प्रयत्न कमालीचा यशस्वी झाला होता. त्यातून राहूल जगताप हे आमदार झाले होते. या तिघांच्या निधनानंतर तालुक्यात सगळेच नेते स्वयंभू झाले आहेत. आमदारकीला अजून वेळ असला तरी मध्यावधी लागू शकतील या शंकेतून अनेकांनी तयारी सुरु केली आहे. गेल्यावेळी काठावर पराभूत झालेले घनशाम शेलार यांनी पुन्हा एकदा नव्या उमेदीने लोकसंपर्काच्या जोरावर मैदानात उतरण्याची तयारी चालवली आहे. माजी आमदार राहूल जगताप यांनाही कुकडी कारखान्याची निवडणूक कधी होते आणि आमदरकीची तयारी कधी सुरु करतो असे झाले आहे.

shivaji kardile
काळेबोराटेनगर परिसरात चोरी-लूटमारीमुळे नागरिकांत घबराट

दोन संधी हातून निसटल्याने हताश झालेल्या अनुराधा नागवडे यांनी तर तयारीही सुरु केलेली आहे. बाळासाहेब नाहाटा हेही लढू शकतो अशी घोषणा करुन गेले आहेत. विद्यमान आमदार पाचपुते हे सध्या आजारी असले तरी तेही मैदानात राहतील यात शंका नाही. त्यामुळे एक नव्हे तर अनेक उमेदवार यावेळी विधानसभेला उभे असतील ही सध्याची शंका आहे.
याच पार्श्वभुमिवर माजीमंत्री कर्डीले हेही श्रीगोंद्यातून नशीब अजमाविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. वाळकी व चिचोंडीपाटील हे नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गट श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाला जोडलेले आहेत. तेथे साधारण ७५ हजार मतदार आहेत. या दोन्ही गटांवर कर्डीले यांचे एकहाती वर्चस्व आहे.

शिवसेनेचे शशिकांत गाडे व संदेश कार्ले यांनाही मानणारा मोठा वर्ग असला तरी ते विधानसभेची अजून तरी तयारी दिसत नाही. त्यातच कर्डीले यांचे व्याही आमदार अरुणकाका जगताप यांचा मांडगवण गटात वर्चास्मा आहे. त्या गटात ४२ हजार मतदार आहेत. श्रीगोंदे मतदार संघात ३ लाख ११ हजार एकुण मतदार आहेत. तालुक्यात जर दोनपेक्षा जास्त तगडे उमेदवार राहिले तर मतांची होणारी विभागणी पथ्यावर पडून नगर तालुक्यातील उमेदवाराला संधी मिळू शकते हे राजकीय गणित समोर येत आहे.
कर्डीले विधानपरिषद लढण्याच्या तयारीत असले तरी त्यांना त्याबाबतीत अजून हिरवा कंदील मिळाला नसल्याने तेथे त्यांना थांबावे लागले तर श्रीगोंदे विधानसभा मतदार संघ त्यांना खुनावत असल्याचे त्यांचे कार्यकर्ते बोलत आहेत. त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरु झाल्याची माहिती आहे.

भाजपाचे नेते आमदार बबनराव पाचपुते गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यातच त्यांचे बंधू सदाशिव अण्णा पाचपुते यांचे अकाली निधन झाल्याने त्यांचे कार्यकर्ते काहीसे अस्वस्थ आहेत. त्यामुळे कर्डीले हे भाजपाकडूनच उमेदवारी मागून लढण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जाते. ही शक्यता गृहीत धरली व पाचपुते आजारी असले तरी त्यांच्याएवढा तगडा लोकसंपर्क कुणाचाही नाही हेही नाकारता येणार नाही. प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची मजबूत फळी केवळ पाचपुते यांचीच असल्याने कर्डीले यांना भाजपाच्या उमेदवारीसाठी झगडावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.