Shrirampur:चप्पल स्टँडवर पाणी उडालं म्हणून स्टॉलधारकांमध्ये मारहाण, श्रीरामपुर पोलीस ठाण्यात फिल्मी स्टाईल राडा

श्रीरामपूर येथील मुख्य रस्त्यावर दिवाळीनिमित्त स्टॉल लावलेल्या दोन स्टॉलधारकांमध्ये पाणी उडाल्याच्या कारणातून हाणामारी झाली.
Shrirampur:चप्पल स्टँडवर पाणी उडालं म्हणून स्टॉलधारकांमध्ये मारहाण, श्रीरामपुर पोलीस ठाण्यात फिल्मी स्टाईल राडा
Updated on

Shrirampur Police Station: श्रीरामपूर येथील मुख्य रस्त्यावर दिवाळीनिमित्त स्टॉल लावलेल्या दोन स्टॉलधारकांमध्ये पाणी उडाल्याच्या कारणातून हाणामारी झाली. दोघेही शहर पोलिस ठाण्यात गेले असता तेथेही शिवीगाळ होऊन मारहाणीचा प्रकार घडला. यात एकाच्या डोक्यात खुर्ची मारण्यात आल्याने गोंधळ उडाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील राम मंदिराजवळ निलोफर आबेद कुरेशी (वय २४, रा.फातेमा हौसिंग सोसायटी, वार्ड नं.२) यांनी चप्पलचा स्टॉल लावलेला आहे. त्यांच्याशेजारी अमीर सय्यद याने लहान मुलांच्या खेळण्याच्या बंदूक विक्रीचा स्टॉल लावलेला आहे. साठलेले पाणी काढताना चप्पलच्या स्टॉलवर पाणी उडाल्याने दोन्ही स्टॉलधारकांमध्ये वादाला सुरुवात झाली. शिवीगाळीचे रूपांतर हाणामारीत झाले.

याप्रकरणी दोन्ही स्टॉलधारक परस्परविरोधी फिर्याद देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात गेले होते. यावेळी तेथेही शिवीगाळ होत असताना पोलिसांनी त्यांना शांत राहण्यास सांगितले. मात्र, पोलिस ठाण्याच्या आवारात मारहाणीचा प्रकार घडला. यात राजू सय्यद यांच्या डोक्यात खुर्ची मारण्यात आल्याने पोलिस ठाण्यात गोंधळ उडाला.

याप्रकरणी हवालदार गौतम लगड यांच्या फिर्यादीवरून रूकसाना बिस्मिल्ला, राजू सय्यद, बिस्मिल्ला राहेमानतुल्ला सय्यद, निलोफर आबेद कुरेशी, आबेद अकबर कुरेशी, तोफिक अकबर कुरेशी यांच्या विरोधात सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

Shrirampur:चप्पल स्टँडवर पाणी उडालं म्हणून स्टॉलधारकांमध्ये मारहाण, श्रीरामपुर पोलीस ठाण्यात फिल्मी स्टाईल राडा
IND vs NZ Semi-Final: सेमीफायनल पावसाने वाहून गेल्यास काय? जाणून घ्या कोणत्या संघाला होणार फायदा अन्...

दरम्यान निलोफर आबेद कुरेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमीर राजू सय्यद, समीर महंमद सय्यद, अमन महंमद सय्यद, नवाज महंमद सय्यद, राजू रहेमतुल्ला सय्यद, महंमद रहेमतुल्ला सय्यद, अमीर सय्यद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच रूकसाना बिस्मिल्ला यांच्या फिर्यादीवरून निलोफर आबेद कुरेशी, आबेद अकबर कुरेशी, तोफिक अकबर कुरेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Shrirampur:चप्पल स्टँडवर पाणी उडालं म्हणून स्टॉलधारकांमध्ये मारहाण, श्रीरामपुर पोलीस ठाण्यात फिल्मी स्टाईल राडा
Uttarkashi Tunnel Accident : ते ४० जण सुखरूप... पाईपने पुरवला जातोय ऑक्सिजन; बचावासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.