Ahmednagar: मार्चअखेर गळीत हंगामाचा ‘दी एण्ड’! अंबालिका साखर कारखान्याची ऊस गाळपात आघाडी

बहुतांशी कारखान्यांची धुराडी फेब्रुवारीतच बंद झाली असती. आजपर्यंत कर्जतच्या अंबालिका साखर कारखान्याने सर्वाधिक सव्वाआठ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे.
Ahmednagar: मार्चअखेर गळीत हंगामाचा ‘दी एण्ड’! अंबालिका साखर कारखान्याची ऊस गाळपात आघाडी
Updated on

Ahmednagar Sugar Factory: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा मार्चअखेरीस पट्टा पडण्याची शक्यता आहे. यंदा गळितासाठी कमी ऊस असतानाही हंगाम लांबला. अवकाळी पावसामुळे ऊसतोडणीस अडथळा निर्माण झाला होता. परिणामी हंगाम रेंगाळला. अन्यथा, बहुतांशी कारखान्यांची धुराडी फेब्रुवारीतच बंद झाली असती. आजपर्यंत कर्जतच्या अंबालिका साखर कारखान्याने सर्वाधिक सव्वाआठ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले आहे.

दोन दिवासांपूर्वी जिल्ह्यातील ऊस गळीत हंगामाविषयी पुणे येथे आढावा बैठक झाली. त्यात साखर कारखान्यांकडून मागविलेल्या संभाव्य हंगाम सांगतेच्या तारखेबाबत चर्चा झाली. पावसाने दडी मारल्याने यंदा ऊस लागवड क्षेत्रात घट झाली.

हंगामासाठी नगर जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी अर्ज केले होते. त्यात १३ सहकारी व ९ कारखाने खासगी आहेत. त्यातील सर्व कारखाने सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यात ६ पैकी केवळ तीन कारखान्यांना परवाना मिळाला. त्या कारखान्यांमार्फत जिल्ह्यातील ऊस गळितासाठी जात आहे. सोलापूर, पुणे जिल्ह्यातील खासगी कारखानेही जिल्ह्यातील ऊस नेत आहेत.(Latest Marathi News)

यंदा साखर कारखान्यांची धुराडी मार्च अखेरीस बंद होतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. गौरी शुगर, मुळा, ज्ञानेश्वर, अशोक साखर कारखान्यांनी मात्र, हंगाम एप्रिलपर्यंत चालण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु बहुतांशी कारखान्यांनी मार्च महिन्याच्या मध्यापर्यंतची तारीख दिली आहे.

Ahmednagar: मार्चअखेर गळीत हंगामाचा ‘दी एण्ड’! अंबालिका साखर कारखान्याची ऊस गाळपात आघाडी
CAA: देशात 7 दिवसांत लागू होणार नागरिकत्व सुधारणा कायदा; केंद्रीय मंत्र्याची 'गॅरंटी'

तोडणी मजुरांकडून अडवणूक

दुसरीकडे पावसामुळे ऊस तोडणीस दिरंगाई होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. उसाची उपलब्धता नसल्याने कारखाने केव्हाही बंद होतील, अशी शेतकऱ्यांना धास्ती आहे. त्याचाच फायदा ऊसतोड मजुरांकडून उचलला जात आहे. शेतकऱ्यांकडून शंभर ते दीडशे रूपये टनाने आगाऊ पैसे घेतले जात आहेत. त्यानंतरच ते कोयता हाती घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. ज्या कारखान्यांकडे जास्तीची ऊस तोडणी यंत्र आहेत, त्यांच्या कार्यक्षेत्रात हा प्रकार नसल्याचे दिसते. (Latest Marathi News)

कोणत्या कारखान्याचे किती गळीत

काळे - ३ लाख ९६ हजार

कोल्हे ३ लाख ५९ हजार

थोरात ५ लाख ३१ हजार

केदारेश्वर १ लाख ८७ हजार

अशोक - २ लाख ९४ हजार

विखे - ४ लाख २७ हजार

अगस्ती - २ लाख

नागवडे - ३ लाख ५४ हजार

वृद्धेश्वर - १ लाख ९६ हजार

ज्ञानेश्वर - ५ लाख ९१ हजार

मुळा - ३ लाख ८५ हजार

कुकडी - १ लाख ६० हजार

गणेश - १ लाख

बारामती ॲग्रो - २ लाख

गंगामाई - ६ लाख ६९ हजार

पीयूष - ८५ हजार

अंबालिका - ८ लाख

२३ हजार

गौरी शुगर - ४ लाख

३७ हजार

क्रांती - १ लाख.

(सर्व आकडे मेट्रीक टनांत)

Ahmednagar: मार्चअखेर गळीत हंगामाचा ‘दी एण्ड’! अंबालिका साखर कारखान्याची ऊस गाळपात आघाडी
Ajit Pawar: भुजबळांच्या मराठा आरक्षणाच्या विरोधी भूमिकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया म्हणाले, 'राज्याचे प्रमुख म्हणून शिंदेचा निर्णय...'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.