अहमदनगर : चार हजारांची लाच घेताना तलाठी व कोतवालास अटक

महसूल विभागातील लाचखोरीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली
चार हजारांची लाच घेताना तलाठी व कोतवालास अटक
चार हजारांची लाच घेताना तलाठी व कोतवालास अटक
Updated on

आश्वी (जि.अहमदनगर) : वारसहक्काची नोंद करण्यासाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी करून, तलाठी महिलेसाठी चार हजारांची लाच स्वीकारताना कोतवाल संदीप तांबेला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले. निमगाव जाळी येथे ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली.

लोकसेवक वर्ग-३ तलाठी स्वाती बबनराव झुरळे (वय ३१) व कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे (वय ३१, रा. निमगाव जाळी, ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. निमगाव जाळी (गोरक्षवाडी) येथील २५ वर्षीय तक्रारदाराच्या आजोबाच्या मृत्युपत्राप्रमाणे तक्रारदाराचे वडील व काकांच्या वारसहक्काच्या नावांची नोंद शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावर करण्यासाठी कोतवाल संदीप तांबे याने मध्यस्थी करीत, या नोंदीसाठी १३ सप्टेंबर रोजी चार हजार रुपयांची मागणी केली होती.

चार हजारांची लाच घेताना तलाठी व कोतवालास अटक
भारतीय वाद्यांच्या आवाजाचे हॉर्न बसविण्यास आक्षेप

महसूल विभागातील लाचखोरीमुळे त्रस्त झालेल्या तक्रारदाराने थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. आज दुपारी एकच्या सुमारास या पथकाने निमगाव जाळीच्या तलाठी कार्यालयात सापळा रचून, चार हजारांच्या रकमेसह कोतवाल तांबे याला ताब्यात घेतले. त्याने ती रक्कम तलाठी स्वाती झुरळे यांच्यासाठी घेतल्याचे कबूल केल्याने, तलाठी झुरळे यांनाही ताब्यात घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.