अहमदनगर : राज्यानेही इंधनावरील कर कपात करावी

राधाकृष्ण विखे पाटील; प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत सपत्नीक लक्ष्मीपूजन
अहमदनगर : राज्यानेही इंधनावरील कर कपात करावी
Updated on

शिर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करून सामान्य जनतेला दिवाळीत दिलासा दिला. आता महाविकास आघाडी सरकार राज्याचे शुल्क कमी करते, की राज्यातील मंत्री तुपाशी व जनता उपाशी, अशी स्थिती कायम राहणार, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला.

लोणी येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत विखे पाटील व त्यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात विखे पाटील व उपाध्यक्ष विश्वासराव कडू यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर : राज्यानेही इंधनावरील कर कपात करावी
दुबई : भारताचा आजही मोठ्या विजयासाठी प्रयत्न

विखे पाटील म्हणाले, केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकण्याचे काम सध्या महाविकास आघाडीचे मंत्री करतात. केंद्र सरकारने जनतेला कोविड लस व धान्य मोफत दिले. कोविडने मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले. आता राज्य सरकारने पाच लाख रुपयांची मदत द्यावी.

राज्य सरकारचे वसुलीवर लक्ष

वीजबिलाची रक्कम उसाच्या रकमेतून वसूल करण्याचा काढलेला फतवा पाहता राज्य सरकारचे लक्ष फक्त वसुलीवर आहे. केंद्र सरकारने राज्याचा जीएसटी परतावा थकविला, या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे यावेळी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.