अहमदनगर - पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंटरसिटी रेल्वे सुरू करण्याची मागणी आहे. ही रेल्वेसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. लवकरच अहमदनगर ते पुणे इंटरसिटी रेल्वे सेवा सुरू होणार आहे. उर्वरित रेल्वे गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांबाबतही लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
येथे अमृत भारत स्थानक योजनेच्या प्रारंभाच्या कार्यक्रमानंतर डॉ. विखे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदी उपस्थित होते. या समारंभास नगर शहरातील शाळकरी विद्यार्थी, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विखे पाटील म्हणाले की, विमानातून प्रवास करण्याची सर्वांनाच इच्छा असते. मात्र, हा प्रवास सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर असतो. विमानप्रवासाचा आनंद हा रेल्वे प्रवासात मिळावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेमुळे लवकरच देशवासीयांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
ते म्हणाले की, रेल्वे प्रवासादरम्यान अत्याधुनिक सुविधा मिळत नाहीत. स्वातंत्र्याचा अमृत कालखंड सुरू असून या कालखंडात भारतीय रेल्वेचा कायापालट करून सर्वसामान्य प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा मानस आहे. प्रवासात तसेच स्थानकावर उच्च दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आज पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अमृत भारत योजनेंतर्गत देशातील ५०८ ग्रामीण, शहरी रेल्वे स्थानकात पायाभरणी झाली.
आगामी काळात ग्रामीण तसेच शहरी भागातील रेल्वे स्थानक हे अद्यावत तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे असतील. ज्या पध्दतीने देशातील विमानतळाचा विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आले. तसेच आता रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण आणि सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
मी वादात पडत नाही
कर्जत-जामखेड एमआयडीसीवरून भाजप आमदार राम शिंदे व राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये वाद पेटला आहे. यावर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले, हा वाद आधी संपू द्या, नंतर मी यावरील उपाययोजनांवर बोलेल. वादात तिसऱ्यानी उडी मारली तर वाद आणखी वाढेल.
या वादामध्ये कोणी मूळ मुद्द्यावर बोलतच नाही. एमआयडीसी कोणी मंजूर केली, कधी केली, कशी केली. हा काही चर्चेचा विषयच नाही आहे. मूळ मुद्दा हा आहे की या एमआयडीसीमध्ये किती प्रकल्प आले? किंवा कितीजणांना एमआयडीसीमध्ये उद्योग सुरू करण्यासाठी अर्ज केले, आहे हेदेखील पाहणे महत्त्वाचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.