Ahmednagar : मंजूर दोन कोटींच्‍या कामांचा; तपासच लागेना, स्थायीच्‍या सभेत तत्काळ माहितीसाठी आग्रह

शहरात पाच हजार वृक्ष लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
ahmednagar
ahmednagarsakal
Updated on

अहमदनगर - पाच लाख रुपयांच्या पुढील आणि २५ लाखांच्या आतील खर्चाच्या कामांना मंजुरी देताना अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार केला जातो, असा आरोप स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला. त्यावर मंजूर कामांच्या फायली तत्काळ स्थायी समितीला उपलब्ध करून द्या, अशा सूचना सभापती गणेश कवडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान सुमारे दोन कोटी रुपयांची ७० ते ८० कामे मंजूर करण्यात आली आहेत.

सभापती गणेश कवडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा झाली. याप्रसंगी नगरसेवक विनित पाऊलबुधे, नगरसेवक मुद्दसर शेख, प्रदीप परदेशी, नज्जू पैलवान, पल्लवी जाधव, सुनीता कोतकर, मंगल लोखंडे आदी उपस्थित होते. शहरात पाच लाखांच्या पुढील आणि २५ लाख रुपये खर्चाच्या आतील कामांना मंजुरी देताना अधिकारी मनमानी करतात.

याबाबत पदाधिकाऱ्यांना काहीच माहिती दिली जात नाही. त्यामुळे कुठे आणि कोणती कामे झाली आहेत, हे माहिती होत नाही. यासाठी ७३ ड अंतर्गत असलेल्या सर्व विषयांच्या फायली अवलोकनासाठी स्थायी समितीला सादर करा, अशा सूचना सभापती कवडे यांनी प्रशासनाला दिल्या. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेला सार्वजनिक शौचालये उभारणीसाठी आलेला चार कोटींचा निधी शासनाकडे परत कसा गेला,

ahmednagar
Ahmednagar : रब्बीची केवळ १५ टक्केच पेरणी; ज्वारीसह गव्हाचेही क्षेत्र घटणार

असा प्रश्न नगरसेवक पाऊलबुधे यांनी उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी निधी खर्च करण्यासाठी वेळ कमी होता व जागा निश्चित झाली नाही. तसेच आधी घनकचरा विभाग दुसऱ्या अधिकाऱ्याकडे होता, असे उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावर सभापती कवडे यांच्यासह पाऊलबुधे यांनी संताप व्यक्त करत संबंधितावर कारवाईच्या सूचना केल्‍या.

५००० वृक्षांचे काय?

शहरात पाच हजार वृक्ष लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम कधी पूर्ण होणार, असा जाब सदस्यांनी विचारला. त्यावर हे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे उद्यान विभागप्रमुख शशिकांत नजान यांनी सांगितले. ठेकेदार ६०० वृक्ष लावल्याचे सांगत आहे.

ahmednagar
Ahmednagar News : गेट अंगावर कोसळल्याने विद्यार्थ्याचा अकोलेत मृत्यू

डिपॉझिट जप्त करणार

शहरातील तोफखाना पोलिस ठाणे ते भिस्तबाग चौक रस्त्यावर चारच महिन्यांत खड्डे पडले आहेत. हे काम करणाऱ्या ठेकेदारावर काय कारवाई केली, असा प्रश्न पाऊलबुधे यांनी उपस्थित केला. यावर ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्याचे डिपॉझिट जप्त करून रस्ता पुन्हा केला जाणार असल्याचे शहर अभियंता मनोज पारखे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.