Nagar Urban bank Fraud: नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण, उद्योजकाला चौकशीसाठी घेतलं ताब्यात; २५ कोटींचं घेतलं होतं कर्ज

संगमनेर येथील अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक अमित वल्लभभाई पंडित यांना शनिवारी (ता.१६) आर्थिक गुन्हे शाखा व संगमनेर शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
Nagar Urban Bank
Nagar Urban Bank Esakal
Updated on

Nagar Urban Bank Fraud: नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणी संचालकांसह जबाबदार असणाऱ्या कर्जदारांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. संगमनेर येथील अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष तथा उद्योजक अमित वल्लभभाई पंडित यांना शनिवारी (ता.१६) आर्थिक गुन्हे शाखा व संगमनेर शहर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. अर्बंन बॅंकेतून पंडित यांनी तब्बल २५ कोटींचे कर्ज घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी नगर अर्बन बँक प्रकरणातील आरोपी अमृतवाहिनी बँकेचे माजी अध्यक्ष अमित पंडित यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पंडित यांना कारवाई होणार असल्याची कुणकुण लागताच ते मोबाइल बंद करून लपून बसले. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने दुपारी पंडित यांच्या घरावर छापा टाकला.

घरझडती घेतली असता ते हाती लागले नाहीत. मात्र, घरातच असल्याचा दाट संशय असल्याने पोलिसांनी प्रत्येक खोलीची तपासणी केली. एका बेडमध्ये लपून बसल्याचे पोलिसांना आढळून आल्यानंतर पंडित यांना ताब्यात घेण्यात आले. (Latest Marathi News)

पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह उपनिरीक्षक रमेश पाटील, सहायक फौजदार रावसाहेब लोखंडे, विशाल कर्पे, हरिश्‍चंद्र बांडे, विवेक जाधव, महिला पोलिस कॉन्स्टेबल योगिता दिघे, जया गभाले यांनी ही कारवाई केली.

Nagar Urban Bank
Shivsena Notice To Advocate Asim Sarode: '२ दिवसात माफी मागा अन्यथा...'; शिवसेना शिंदे गटाकडून ॲड. असिम सरोदेंना नोटीस, काय आहे कारण?

बँकेचा परवाना पूर्ववत करण्यास नकार

नगर अर्बन बँकेचा रिझर्व्ह बँकेने रद्द केलेला बँकिंग परवाना पूर्ववत करण्याची तत्कालीन संचालक मंडळाने केलेली मागणी केंद्रीय अर्थ मंत्रालयाने फेटाळून लावली आहे. बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती, ३१ मार्च २०२३ अखेर असलेला ९७ टक्के एनपीए, डीआयसीजीसीला पैसे परतफेड करण्याची असमर्थता आदी कारणांमुळे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने रिझर्व्ह बँकेचा निर्णय कायम ठेवत परवाना पूर्ववत करण्याची मागणी अमान्य केली. (Latest Marathi News)

तत्कालीन अध्यक्ष व संचालकांनी बँकेची आर्थिक स्थिती सुधारत असल्याचा दावा केला होता. मात्र, आता या निकालाने तो दावा किती खोटा होता हे समोर आले, अशी प्रतिक्रिया बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिली.

Nagar Urban Bank
Devendra Fadanvis: मी पुन्हा आलो, पण दोन पक्ष फोडून अन् दोन साथीदारांना घेऊन- देवेंद्र फडणवीस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.