अहमदनगर - श्वानदंश झाल्यानंतर रेबीज टाळण्यासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. पूर्वी ही इंजेक्शन नाभीजवळ घ्यावी लागत. त्यामुळे श्वानदंशापेक्षा इंजेक्शनचीच जास्त भीती असायची. आता लसीची मात्रा अन् जागा बदलली असली, तरी भीती जात नव्हती. यावर सरकारने आता श्वानांनाच रेबीज प्रतिबंधक लस देण्याची मोहीम हाती घेतली आहे.
विसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ४८ हजार ६०० भटकी आणि २७ हजार ५८३ पाळीव कुत्री आहेत. आजअखेर १४ हजार २९९ प्राण्यांना लस दिली आहे. यात ५२६ मांजरे, तर ६ हजार ३५६ इतर प्राण्यांचा समावेश आहे. अद्याप ६१ हजार ८८४ प्राण्यांना लस देणे बाकी आहे. श्वानांसोबत घरात मांजरही पाळली जाते. तीही चावा घेऊ शकते.
त्यातूनही रेबीजची शक्यता असते. त्यांनाही प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. भटक्या कुत्र्यांमुळे श्वानदंशाची शक्यता असते. पिसाळलेला कुत्रा चावल्यास रेबीजमुळे जीवितास धोका निर्माण होतो. या कुत्र्यांनाच रेबीज प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. जिल्ह्यातील श्वानांना पशुसंवर्धन विभागातर्फे रेबीज प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. प्रत्येक व्यक्ती अथवा जनावराला श्वानदंश होऊ न देणे, तो झाल्यास प्रथमोपचार घेत प्रभावी उपाययोजनेसाठी रेबीज रोगाविषयी जनजागृती केली जाते, असे दशरथ दिघे यांनी सांगितले.
श्वान आणि मांजरांना रेबीज प्रतिबंधक लस दिली जात आहे. मोहिमेव्यतिरिक्तही लसीकरण केले जाणार आहे. ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतल्यास जिल्ह्यातील सर्व श्वानांना लस दिली जाईल. लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
दशरथ दिघे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी.
तालुकानिहाय लसीकरण
तालुका श्वान मांजर
अकोले २७८ ३८
संगमनेर ५३८ ११५
राहुरी ५११ ३
राहाता ७५९ ३८
कोपरगाव ३८८ १९
श्रीरामपूर ५६८ १६
नेवासे ५८६ २६
पारनेर ३१५ २७
शेवगाव ३४३ ०
पाथर्डी २११ ११
कर्जत १३६९ १५९
श्रीगोंदे ३८८ ४६
जामखेड ७४५ २८
नगर ४१८ ०
एकूण १४,२९९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.