Ahmednagar : एमआयडीसी मंजूर करणे का सुचले नाही; राधाकृष्ण विखे पाटील यांचा सवाल

विवेक कोल्हे यांना नाव न घेता टोला
Ahmednagar news
Ahmednagar newsesakal
Updated on

कोपरगाव : जिल्ह्याला गेली सात वर्षे महसूलमंत्री लाभले होते. कोपरगावला सध्या त्यांचेच मार्गदर्शन मिळत आहे. त्यांचे बोट तुम्ही सोडायला तयार नाही. मात्र, ज्यांना तुम्ही खांद्यावर घेऊन नाचता, त्यांच्या कारकिर्दीत एमआयडीसी मंजूर करून घेण्याचे तुम्हाला का सुचले नाही. तुम्हाला जमले नाही, तर किमान बोलू तरी नका, असा टोला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांचे नाव न घेता लगावला.

Ahmednagar news
Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

आमदार आशुतोष काळे यांना विकासाची दृष्टी आहे. त्यांनी जनसामान्यांना चोवीस तास वेळ देऊन चांगले काम करावे. जशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला गॅरंटी दिली, तशी आमदार काळे यांना माझी सर्व अर्थाने गॅरंटी आहे, असेही मंत्री विखे पुढे म्हणाले.

Ahmednagar news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

संवत्सर येथील ग्रामीण रुग्णालय, वारी-संवत्सर रस्त्याचे भूमिपूजन, दिव्यांगांना सहायक साधने वाटप, कृषी विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना ट्रॅक्टर वाटप, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कचरा संकलन, रिक्षा वाटप मंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आले. खंडकरी शेतकरी, संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने मंत्री विखे यांचा नागरी सत्कार यावेळी करण्यात आला.

Ahmednagar news
Relationship Tips: वैवाहिक जीवनात गोडवा आणतात या चांगल्या सवयी, जोडिदार करतो मनापासून प्रेम

प्रास्ताविक महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी केले. आमदार काळे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, बीएसएनएलचे संचालक रवींद्र बोरावके आदी व्यासपीठावर उपस्थित होते. विखे पुढे म्हणाले की, सेवा, सुशासन व गरीब कल्याण या त्रिसूत्रीवर पंतप्रधान मोदी देशाला प्रगतिपथावर नेत आहेत. आयुष्यमान भारत, ८० कोटी जनतेला मोफत धान्य, मोफत लसीकरण, शासन आपल्या दारी, एक रुपयात पीकविमा अशा केंद्र व राज्य सरकारच्या योजनांतून सर्वसामान्यांचा विकास साधण्याचे दायित्व शासनाने स्वीकारले आहे, असे मंत्री विखे यावेळी म्हणाले.

शासनावर शेतकरी आणखी किती दिवस अवलंबून राहणार. शेतकऱ्यांनी शेतीला नवीन तंत्रज्ञानाची जोड देत शेतीपूरक व्यवसायाला प्राधान्य द्यावे. नसते राजकारण डोक्यातून काढून टाका. आपण कोणाची कधी जिरवायची हे ठरवू. ते काम माझ्यावर सोपवा.

- राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.