अहमदनगर : एकीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थी मराठी माध्यमाकडे वळत असताना दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक १६१ शाळांत १० पेक्षाही कमी विद्यार्थिसंख्या आहे. या शाळांवर बंदची टांगती तलवार आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ५६४ शाळा आहेत. यातील १६१ शाळांमध्ये १० पेक्षा कमी पट आहे. ६१२ शाळा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या आहेत. जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असणाऱ्या सर्वाधिक ४० शाळा अकोले तालुक्यात आहेत. २० शाळा पाथर्डीत, २० संगमनेरात, १२ शेवगावमध्ये, तर १३ श्रीगोंदा तालुक्यात आहेत. या जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे.
राज्यातील तब्बल १५ हजार जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी झाल्याचे मागील आठ महिन्यांपूर्वीच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. त्यामुळे अशा शाळा बंद करून तेथील विद्यार्थी शेजारच्या शाळेत वर्ग करण्याचे, तसेच शिक्षकांचे इतर शाळांत समायोजन करण्याच्या दृष्टीने वर्षभरापूर्वी शासनाने माहिती मागवली होती.
मात्र, त्यास विरोध झाल्याने तुर्तास शासनाने कमी पटसंख्येच्या शाळा बंद केलेल्या नाहीत, असे शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी सांगितले.
निवेदनावर सोमनाथ बोंतले, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव विजय कराळे, उर्दू जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, जिल्हा सचिव महेश पाडेकर, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, रूपाली कुरूमकर आदींची नावे आहेत.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन
शाळा बंद करू नये यासाठी शिक्षक भारतीच्या वतीने शिक्षण मंत्री यांना निवेदन देण्यात आले. शाळा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा गाडगे व जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्षा आशा मगर यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.