Ahmednagar ZP Recruitment : झेडपी भरती परीक्षा प्रक्रिया पुन्हा रूळावर

तलाठी भरतीच्या परीक्षेत सर्व्हरमुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला
Ahmednagar ZP
Ahmednagar ZPSakal
Updated on

अहमदनगर : जिल्हा परिषदेची १९ संवर्गासाठीची भरतीची परीक्षा प्रक्रिया पुन्हा रूळावर आली आहे. गेल्या आठवड्यात ही प्रक्रिया अचानक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. या स्थगितीचे कारण समजू शकले नाही. मात्र, तांत्रिक अडचण आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भरतीची परीक्षा प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने उमेदवारांचा जीव भांड्यात पडला आहे. ही प्रक्रिया आचारसंहितेत अडकते की काय, अशी त्यांना शंका होती. अहमदनगर जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील पदांसाठी भरती केली जात आहे. ९३७ पदांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी सुमारे ५० हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

आतापर्यंत सात पदांसाठी भरती प्रक्रिया झाली आहे. कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता विद्युत, विस्तार अधिकार (कृषी), सहायक लेखा, वरिष्ठ सहायक लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारीआदी पदांसाठी परीक्षा झाली आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेत सर्व्हरमुळे उमेदवारांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. जिल्हा परिषदेची विविध संवर्गाची भरतीची ही परीक्षा आतापर्यंत सुरळीत चालू होती. आयबीपीएस कंपनी ही परीक्षा घेत आहे. मात्र, तांत्रिक अडचण आल्याने अचानक ही परीक्षा स्थगित केली होती. ऐनवेळी भरतीची परीक्षा स्थगित केल्याने उमेदवार धास्तावले होते. परीक्षेचे हॉलतिकीटही डाउनलोड होत नव्हते.

कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य परिचारिका, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक पुरुष, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, औषध निर्माण अधिकारी आदी पदांसाठी परीक्षा झालेली नाही. त्याचे वेळापत्रकही जाहीर केलेले नाही.

१ तारखेपासून पुन्हा पेपर

आयबीपीएस कंपनीने पुन्हा परीक्षेसाठी सज्ज असल्याचे कळवले. १ नोव्हेंबरपासून ही परीक्षा होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर झळकले आहे. ज्युनिअर मॅकेनिक, मॅकेनिक, कनिष्ठ आरेखक या पदांसाठी १ तारखेला परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आहे. २ नोव्हेंबरचेही शेड्यूल आल्याचे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.