अहमदनगर : कोविड सेंटरमधून साहित्याची चोरी

दोन लाख २७ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.
covid Center
covid Center sakal
Updated on

राहुरी: देवळाली प्रवरा येथील नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीमधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर चोरट्यांनी फोडले. दोन लाख २७ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी पालिका वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळाली प्रवरा येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली होती. तत्कालीन नगराध्यक्ष सत्यजित कदम मित्रमंडळातर्फे सुरू करण्यात आलेल्या हेल्थ सेंटरमध्ये अत्यल्प दरात उपचार करण्यात आले. त्यामुळे, कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत शेकडो रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या घटल्याने कोरोना सेंटर बंद करण्यात आले होते.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना सेंटर उभारताना सेंट्रलाइज ऑक्सिजन सिस्टीम उभारून, ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आले होते. ऑक्सिजन सिस्टीमसाठी सुमारे तीनशे फूट लांबीची तांब्याच्या धातूची ऑक्सिजन वाहिनी बसविण्यात आली होती. चोरट्यांनी तांब्याच्या धातूची सुमारे सव्वादोन लाखांची ऑक्सिजन नलिका व दोन हजारांचे सीसीटीव्ही स्क्रीन, असा मुद्देमाल चोरला. पाच ते सहा एप्रिलच्या मध्यरात्री चोरीची घटना घडल्याचा संशय आहे.

आज (शनिवारी) सकाळी बंद कोविड सेंटरच्या प्रवेशद्वाराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आल्याने चोरीची घटना लक्षात आली. राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.