Ahmednagr News : वासरे, देशी जनावरे टार्गेट "लम्पीचे शेवगाव, नेवासे, राहुरी हॉट स्पॉट"

शंभर टक्के लसीकरणानंतरही लागण होत असली, तरी जनावरे बरी होण्याचे प्रमाण लक्षणीय (७० टक्के) आहे. १७९ जनावरे दगावली आहेत.
ANIMAL
ANIMAL SAKAL
Updated on

अहमदनगर - लम्पीने या वर्षी गोदावरी आणि प्रवरा नदीकाठाकडे मोर्चा वळवला आहे. शेवगाव, नेवासे, राहुरी, कोपरगाव तालुके हॉट स्पॉट ठरले आहेत. आजअखेर २ हजार ५१४ जनावरे बाधित आहेत. आता गावरान जनावरे आणि वासरांना सर्वाधिक बाधा होत आहे.

शंभर टक्के लसीकरणानंतरही लागण होत असली, तरी जनावरे बरी होण्याचे प्रमाण लक्षणीय (७० टक्के) आहे. १७९ जनावरे दगावली आहेत.

गेल्या वर्षी राज्यात बाधित जनावरांमध्ये सर्वांत पुढे असलेला नगर आता आठव्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी भीमा नदीकाठावरील कर्जत आणि श्रीगोंदे तालुक्यांत सर्वाधिक लागण होती.

संगमनेरही हॉट स्पॉट होता. यंदा त्या तालुक्यांत बाधित जनावरांचे प्रमाण कमी आहे. बाधित जनावरांना गोट फॉक्स हीच लस दिली जात आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण १०० टक्के आहे. गेल्या वर्षी २० ऑक्टोबरला लसीकरण संपले होते. यंदा ते ९ ऑगस्टलाच पूर्ण झाले. एकूण १३ लाख ९९ हजार जनावरांना लस दिली आहे.

ANIMAL
E-Peek Server Down : ई-पीक नोंदीचा सर्व्हर डाऊन; शेतकऱ्यांचं होणार मोठं नुकसान, प्रशासन करतंय तरी काय?

पावसाळ्यात डास, गोचिड, गोमाश्‍या मोठ्या प्रमाणात होतात. त्यामुळे प्रादुर्भावाचे प्रमाण वाढते. यंदा जिल्हा परिषदेतर्फे गोठ्यात फवारणी केली जात आहे. जनावरांच्या अंगावर पावडर टाकली जाते. परिसरही स्वच्छ ठेवला जातो.

लसीकरण राहिले असल्यास शेतकऱ्यांनी यंत्रणेच्या ते निदर्शनास आणून द्यावे. आजारी जनावरांवर लगेच सरकारी डॉक्टरांकरवी उपचार करावेत. गोठ्याची स्वच्छता ठेवावी. तसेच नवीन जनावरे खरेदी करण्याचा मोह टाळावा, अन्यथा स्वतःच्या गोठ्यातील जनावरे बाधित होऊ शकतात.

ANIMAL
Ahmednagar : माजी सैनिकाच्या घरातून १८ तोळे सोने लंपास

- डॉ. सुनील तुंबारे,

उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

नवीन व्हेरिएंट नाही

यंदा पहिले बाधित जनावर शेवगाव तालुक्यात आढळले. त्यामुळे परिसरातील जनावरांचे रक्ताचे सॅम्पल घेऊन ते दोन महिन्यांपूर्वीच पशुसंवर्धनच्या रोग अन्वेषण विभागाकडे पाठवले. तेथून ते बंगळुरूच्या प्रयोगशाळेत पाठवले. त्यावर संशोधन केल्यानंतर उपायांबाबत काही मार्गदर्शक सूचना आल्या आहेत.

आतापर्यंत कोणताही नवीन व्हेरिएंट आढळला नाही. गोट फॉक्स लसीचा चांगला परिणाम होत आहे. हे शुभ वर्तमान असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ANIMAL
Amhadnagar News : शटडाउनमुळे कोलमडले पाणीपुरवठ्याचे नियोजन

कुठे किती लागण?

जामखेड - २४, कर्जत - ४७, कोपरगाव - २९८, नगर - ४४, नेवासे - ३२४, पारनेर - ४१, पाथर्डी - २८८, राहाता - ८१, राहुरी - ४२८, शेवगाव - ५९६, संगमनेर - ६, श्रीगोंदे - २८६, श्रीरामपूर - ५१, अकोले - ०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.