अजितदादांना लागली नीलेश लंकेंच्या आरोग्याची काळजी

भाळवणीत उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये असतात कार्यरत
Ajit pawar And nilesh lanke
Ajit pawar And nilesh lankeE sakal
Updated on

पारनेर ः मी अजित पवार (Ajit Pawar) बोलतोय... नीलेश कसा आहेस.... असे म्हणत आरे बाबा तू स्वतःची काळजी घे, रूग्णांची सेवा करतो आहेस, हे वाचून तसेच तुझे काम करतानाचे व्हिडीओ पाहून आनंद वाटला. मात्र, तुझ्या आरोग्यकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसतंय. तू स्वतःची काळजी घे... असा काळजीवजा सल्ला देऊन आमदार नीलेश लंके यांचे कौतुक केले. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला होता. काही गरज लागली तर मला सांगा, असेही पवार यांनी आवर्जून सांगितले. (Ajit Pawar to take care of MLA Nilesh Lanke's health)

Ajit pawar And nilesh lanke
आमचं नाक दाबलं तर तुमचं तोंड दाबू, जगतापांचा पुणेकरांना इशारा

या वेळी पवार यांनी आमदार लंके यांच्या वतीने भाळवणी येथे सुरू असलेल्या कोविड सेंटरच्या कामाबद्दल कौतुकही करत काळजी घेण्याचा सल्लाही दिला. आमदार लंके यांच्या पुढाकाराने भाळवणी येथे एक हजार शंभर बेडचे कोविड सेंटर चालविले जात आहे. लंके यांच्या या कामाची राज्यभरात चर्चा आहे. या कोविड सेंटरची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही कल्पना आहेच.

लंके हे रूग्णांच्या जवळ जातात चौकशी करतात, त्यांच्याशी बोलतात तसेच अनेक वेळा ते कोरोना सेंटरमध्येच कार्यकर्त्यांसमवेत व साहित्य ठेवण्याच्या खोलीतच झोपतात. हे करताना न कळत मास्क किंवा सॅनिटायझर वापरताना हलगर्जीपणा होतो. त्यामुळेच काळजी घेण्याविषयी अजित पवार यांनी सल्ला दिला.

आमदार लंके (MLA Nilesh Lanke) यांच्या या कामाचे अनेकांनी येथे प्रत्यक्षात भेट देऊन पहाणी करून कौतुक केले. या पूर्वी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनीही फोन करून लंके यांचे कौतुक केले होते.

जयंत पाटील यांनीही फोन करून तुम्ही कोरोनाच्या (corona) काळात करत असलेल्या कामाची राज्यात खूप चांगली चर्चा होत आहे. मात्र, तुम्ही काळजी घ्यावी. रूग्णांच्या फार संपर्कात सतत जाऊ नका, असा सल्लाही दिला होता. खासदार सुप्रिया सुळें याही अनेकदा लंके यांचे फेसबुक, ट्विटरवरून कौतुक करून प्रोत्साहन देत असतात.(Ajit Pawar to take care of MLA Nilesh Lanke's health)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.