Akole News : सरकारी रुग्णालयात शुकशुकाट रुग्ण शहराच्या दिशेने

सरकारी रुग्णालयात शुकशुकाट आहे. थंडी, ताप सोडले, तर मोठ्या आजाराचे रुग्ण शहराची वाट धरून उपचार करत आहेत.
Akole News
Akole Newssakal
Updated on

अकोले : अकोले तालुका आदिवासी अतिदुर्गम तालुका असून, ७० वर्षे उलटूनही आजही आरोग्याच्या सुविधा न मिळाल्याने तालुक्यातील रुग्ण सरकारी रुग्णालय सोडून खासगी रुग्णालयात उपचार घेणे पसंद करत आहेत.

त्यामुळे सरकारी रुग्णालयात शुकशुकाट आहे. थंडी, ताप सोडले, तर मोठ्या आजाराचे रुग्ण शहराची वाट धरून उपचार करत आहेत. हजारो रुपये खर्च करून सरकारी रुग्णालय नको रे बाबा म्हणत कर्जाचा डोंगर घेऊन आपला रोजचा दिनक्रम करत आहेत.

अकोले तालुक्यात जवळपास ३२५ गावे आहेत, त्यात केवळ १२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ७० उपकेंद्र, पाच रुग्णालय अजून, जिल्हा उपरुग्णालय सुरू नाही. त्यामुळे रुग्णांची कुचंबणा होत आहे. ‘रोजचे मरण त्याला कोण रडे,’ असे म्हणत आजही आदिवासी समाज गंडे, दोरे, भष्म, भगत यांच्याकडे जाऊन आजार बरे करतात. काही रुग्ण झाडपाला आणून बरे होतात. सध्या स्थितीला गावागावात डेंगू, गॅस्ट्रोचे रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. या रुग्णालयातील डॉक्टर अवाच्या सव्वा फी आकारून रुग्णांना बरे करतात ,मात्र शासकीय आरोग्य यंत्रणा कमी पडण्याची कारणे समोर येत नाहीत.

सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार होतात; मात्र काही तासातच त्यांना चिट्ठी देऊन अकोले, संगमनेर, कवठ दरा, नाशिक, पुणे येथे हलविण्यात येते, याबाबतही चौकशी होणार आवश्यक आहे; मात्र तालुका आरोग्य अधिकारी प्रभारी असल्याने त्यांना याबाबत निर्णय घेता येत नाही.

औषधांचाही तुटवडा

सध्या औषधांचा तुटवडा असून, वन्य प्राण्यांनी चावा घेतल्यास उपचारासाठी शहरात जावे लागते. सर्पदंश, श्‍वान चावल्याचे उपचार उपलब्ध नसल्याने मोठ्या शहरात रुग्णांना जावे लागते. त्यामुळे सरकारी रुग्णालयात शुकशुकाट पहायला मिळतो.

सरकारी यंत्रण खिळखिळी

सरकारी रुग्णालयात असणारे कर्मचारी नेते, अधिकारी, पत्रकारांच्या नात्यात असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणा खिळखिळी झाली आहे. थंडी, ताप, खोकला, गॅस्ट्रो याबाबत थातूर मातूर उपचार केले जातात. गरोदर महिला, बाळंत महिला, स्तनदा माता यांच्याबाबतही उदासीनता असून, एक्स-रे काढण्यासाठी रुग्णांसाठी अकोले, राजूर येथे सुविधा आहे. तीही खर्चिक आहे. त्यावर उपाययोजना आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.