Driver Saved Woman's Life:रुग्णवाहिका चालक देवासारखा आला! अवेळी प्रसूतीमध्ये असलेल्या महिलेची झोपडीत केली प्रसूती

रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान दाखवत स्वत:च दायी होत अवेळी प्रसूतिमध्ये अडकलेल्या ऊसतोडणी कामगार महिलेची चंद्रमौळी झोपडीत सुखरूप प्रसूती केली.
Driver Saved Woman's Life
Driver Saved Woman's LifeSakal
Updated on

Ambulance Driver Performed Delivery of Labour Woman: रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान दाखवत स्वत:च दायी होत अवेळी प्रसूतिमध्ये अडकलेल्या ऊसतोडणी कामगार महिलेची चंद्रमौळी झोपडीत सुखरूप प्रसूती केली. यामुळे संबंधित महिला आणि बाळाला जीवदान मिळाले आहे.

वायसेवाडी (ता. कर्जत) येथे चाळीसगाव येथून ऊस तोडणीसाठी आलेल्या पूजा साईनाथ चव्हाण (वय २५) ही महिला आठव्या महिन्यातच घरी काम करत असतानाच तिला अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. ही परिस्थिती पाहून वायसेवाडीतील नीलेश पावणे यांनी राशीनचे रुग्णवाहिका चालक शेखर जाधव यांना फोन करून घटनेची माहिती दिली. जाधव हे रुग्णवाहिकेसह तत्काळ घटनास्थळी गेले. मात्र, संबंधित महिला रुग्णवाहिकेत बसण्याच्या स्थितीत नव्हती. बाळाचे डोके

अडकल्याचे आणि असह्य वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेला पाहून जाधव यांनी संबंधित महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीने गरोदर मातेला व तिच्या सासूबाईला धीर देत प्रसूतिमध्ये अडवलेल्या गरोदर मातेची शर्थीचे प्रयत्न करीत सुखरूप प्रसूती केली.(Latest Marathi News)

दुपारी अडीचच्या सुमारास मुलगा जन्माला आला. आईच्या आणि बाळाच्या जीवितास निर्माण झालेला धोका टळला. प्रसूतिनंतर बाळासह आईला जाधव यांनी रुग्णवाहिकेतून राशीनच्या खासगी रुगणालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून आईला व बाळास योग्य औषधोपचार करून आई व बाळ सुखरूप असल्याचे सांगितले. अन् सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. त्यानंतर या महिलेस आणि बाळास पुन्हा तिच्या उसाच्या फडातील झोपडीत सुखरूप पोहोच केले.

Driver Saved Woman's Life
Sharad Mohol Case: शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणेला न्यायालयीन कोठडी; मुख्य सुत्रधार अद्याप फरार

रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान दाखवून स्वत:कडे असलेल्या अनुभवाच्या बळावर हे बाळंतपण पार पाडल्याने ऊसतोडणी कामगार महिलेसह तिच्या कुटुंबीयांनी आणि वायसेवाडीकरांनी रुग्णवाहिका चालक जाधव यांचे कौतुक केले. (Latest Marathi News)

संबंधित महिलेची त्याक्षणी असलेली स्थिती कठीण असल्याचे लक्षात आले. माझ्याकडे दवाखान्यातील कामाचा अनुभव असल्याने आणि महिलेच्या नातेवाईकांनी साथ दिल्याने मी हे बाळंतपण सुखरूप करू शकलो.-शेखर जाधव,रुग्णवाहिका चालक

Driver Saved Woman's Life
Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.