राज्यातील यात्रा, जत्रांना परवानगी कधी? अमित देशमुख म्हणाले..

Amit deshmukh
Amit deshmukhCanva
Updated on

संगमनेर (जि. नगर) : कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षापासून सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली आहे. कोविडच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका वर्तविण्यात येत असला तरी, राज्यातील लोककलावंतांना कोविड काळात आर्थिक सहाय्य व तमाशा फडाना मदत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. हळूहळू राज्यातील यात्रा आणि जत्रांना परवानगी देणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या शिष्टमंडळाला दिली.

राज्यातील ढोलकीवरील लहान मोठे सुमारे 130 तमाशा फड कोविडमुळे ठप्प असल्याने, यावर उपजिवीका असलेले ग्रामीण भागातील लोककलावंत उपासमार सहन करीत आहेत. आज उद्या करता करता दिड वर्ष उलटले तरी, त्यांच्या फडावरची ढोलकी कडाडली नाही. चरितार्थासाठी या कलावंतांना रोजंदारीची कामे करावी लागली. दसऱ्यापासून तमाशा कलावंतांचा सुरु झालेला हंगाम पावसाळ्याच्या सुरवातीपर्यंत चालतो. कोवीड प्रादुर्भावामुळे राज्यातील यात्रा, जत्रा बंद असल्याने तमाशा कलेवर अवकळा आली आहे.

Amit deshmukh
विकासाच्या कामात राजकारण आडवे येवू दिले नाही : विखे पाटील

या पार्श्वभुमिवर आज मुंबईच्या मंत्रालयात अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळाने सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची भेट घेतली. राज्यातील पूर्णवेळ तमाशा फड आणि हंगामी तमाशा फडांना प्रतिवर्षी शासनाकडून अनुदान मिळावे, तमाशा फडांना एक तासांचा अधिक वेळ वाढवून मिळावा, गाव यात्रा चालू करुन तमाशा फडांच्या कार्यक्रमांना परवानगी मिळावी अशा काही मागण्यांचे निवेदन यावेळी मंत्री देशमुख यांना देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या उपाध्यक्षा मंगला बनसोडे, सचिव शेषराव गोपाळ, उपसचिव मोहीत नारायणगांवकर, खजिनदार किरण ढवळपूरीकर, संचालक राजेश सांगवीकर, अविष्कार मुळे, मुसा इनामदार आदी उपस्थीत होते.

Amit deshmukh
…तर बदली करून घ्या; आमदार काळेंनी महावितरण अधिकाऱ्यांना सुनावले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.