सात कोटी रुपये फसवणूक प्रकरणातील एका आरोपीस नाशिक येथून अटक

आरोपीस अटक
आरोपीस अटकई सकाळ
Updated on
Summary

त्यास नेवासे न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे.

सोनई (अहमदनगर) : सोनई व परिसरात चार वेगवेगळ्या संस्थेचे नाव घेत एका वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे अमिष दाखवून अनेक लाभधारकांना सात कोटीचा गंडा घालून फरार झालेल्या रॅकेटमधील एका आरोपीस सोनई पोलिसांनी नाशिक येथून अटक केली आहे. (an accused in a rs seven crore fraud case in sonai has been arrested from nashik)

आरोपीस अटक
वडापावमुळे सापडले सोनई गावची झोप उडवणारे चोरटे

सोनई व परिसरातील अनेक तक्रारदारांच्या वतीने आण्णासाहेब मिठ्ठू दरंदले (रा.सोनई) यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी सोनई पोलिस ठाण्यात विष्णु रामचंद्र भागवत रा.दवंडगाव (जि.नाशिक), निलेश जनार्दन कुंभार रा.मंचर (जि.पुणे), सुरेश सिताराम घंगाडे रा.तळेगाव (जि.पुणे), राजेंद्र वामन देशमुख, प्रवीण गंगाधर कवडे रा.कोतुळ(जि.नगर), शांताराम अशोक देवतरसे (रा.सोनई ) यांच्या विरुद्ध फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली होती. यातील विष्णु भागवत यास मंगळवार (ता.२२) रोजी नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. त्यास नेवासे न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली आहे.

आरोपीस अटक
'शनि' चा पहिला शनिवार सुनासुनाच; सोनई परिसरात कडकडीत लाॅकडाऊन

उज्वलम ऍग्रो, माऊली मल्टीस्टेट, संकल्पसिध्दी इंडिया प्रा.लि.,प्राॅफिट टिचर फ्लाय हाॅलिडे या संस्थेचे नाव सांगून एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे अमिष दाखविण्यात आले. विमान प्रवासाने सहल व जमिन देण्याचे अश्वासन देण्यात आले होते. संबंधितांनी सन २०१७ ते २०१९ दरम्यान पैसे जमा करुन नेले होते. ही स्किम सोनईत आल्यानंतर या भागातील काही प्रमुख व्यक्तींना हाताशी धरुन चार कंपनीच्या हस्तकांनी आपली झोळी भरुन घेतली होती.

आरोपीस अटक
सोनई गडाख बंधूंचीच आणि नेवासाही, सगळीकडे सोयीचे आरक्षण

एका वर्षात रक्कम दामदुप्पटचे अमिष असल्याने अनेकांनी यात पैसे गुंतवले होते. वर्ष उलटूनही रक्कम मिळाली नसल्याने सर्वाचेच धाबे दणाणले. पैसे मिळायची शक्यता नसल्याने अखेर सात महिन्यापूर्वी फिर्याद दिली होती. या फसवणूक प्रकरणातील अन्य आरोपीस लवकरच अटक करण्यात येईल. असे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांनी सांगितले. (an accused in a rs seven crore fraud case in sonai has been arrested from nashik)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()