आत्महत्येचा विचार डोक्यातून काढा; देवरेंना हजारेंचा सल्ला

anna hajaze
anna hajazeesakal
Updated on

राळेगणसिद्धी (जि.अहमदनगर) : आत्महत्येचा विचार करणे योग्य नाही. तो डोक्यातून काढून पुढील वाटचाल करा, असा सबुरीचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (anna hazare) यांनी तहसीलदार ज्योती देवरे (tehsildar jyoti deore) यांना दिला. व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर आज पारनेरच्या तहसीलदार देवरे यांनी राळेगणसिद्धी येथे येऊन हजारे यांची भेट घेतली. रक्षाबंधनानिमित्त (raksha bandhan) आज देवरे यांनी हजारे यांना राखी बांधली. मला तुमचे आशीर्वाद असू द्या, अशी विनंती केली. त्या म्हणल्या, की मी माझा संघर्ष करण्याची, लढण्याची तयारी केली आहे. फक्त मला लढ म्हणा व माझ्यावर तुमचा आशिर्वाद कायम असो. मी महिला असल्यामुळे त्रास होतोय, कदाचित मी पुरुष असते, तर मला त्रास झाला नसता. मी भ्रष्टाचार केलेला नाही. ते चौकशीत सिद्ध होईल. चौकशी समितीसमोर जायची माझी तयारी आहे, मात्र ती चौकशी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांकडून व्हायला पाहिजे. त्यावर हजारे म्हणाले, की खरे तर मला या वादात पडायचे नाही, मात्र जीवनात संकटे येतच असतात. त्याला न घाबरता धैर्याने सामोरे गेले पाहिजे. संकटावर मात केली पाहिजे. कारण मनुष्य जन्म हा एकदाच आहे. तुकाराम मुंढे या अधिकाऱ्यासारखे न डगमगता काम चालू ठेवले पाहिजे.

anna hajaze
लंके २५ वर्षे सत्तेत राहणार; इंदुरीकर महाराजांचे समर्थन

माझी लढायची तयारी आहे. मी आज अण्णांना भेटले. माझी बाजू मांडली. चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे. - ज्योती देवरे, तहसीलदार, पारनेर

तहसीलदार देवरे यांनी आज माझी भेट घेतली. तसेच कालही आमदार नीलेश लंके यांनी माझी भेट घेऊन माहिती दिली. दोघांचेही म्हणणे ऐकून घेतले, परंतु अधिकारी आणि पदाधिकारी यांच्या वादात मला पडण्याची इच्छा नाही. - अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक

anna hajaze
बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार! वळसे-पाटलांची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.