CM केजरीवाल यांना सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता अशी नशा : अण्णा हजारेंटची टिका

Anna Hazare Criticised Arvind Kejriwal
Anna Hazare Criticised Arvind Kejriwalesakal
Updated on

पारनेर (जि. अहमदनगर) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सत्तेतून पैसा व पैशातून सत्ता अशी पैसा व सत्तेची नशा चढली आहे. त्यांच्या बोलण्यात व वागण्यात फरक दिसतो हे सरकारने नुकतेच दारू विषयक नवीन धोरण जाहीर केले यावरून दिसते.

तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याचाही तुम्हाला विसर पडला. विधानसभेत मजबूत लोकायुक्त कायदा करण्यासाठी तुम्ही प्रयत्नही केले नाहीत. उलट तुमच्या सरकारने चुकिचे दारू धोरण केले यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली आहे. (Anna Hazare criticism on CM Arvind Kejriwal Ahmednagar Latest Political News)

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना हजारे यांनी आज (ता. 30 ) पत्र पाठऊन त्यांच्यावर टीका करत त्यांचा समाचार घेतला आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, "तुम्ही सत्ता व सत्तेतून पैसा या दुष्टचक्रात अडकलेले दिसतात", तुम्ही मुख्यमंत्री झाल्यानंतर मी तुम्हाला पहिल्यांदाच पत्र लिहित आहे.

अनेक दिवसांपासून दिल्ली सरकारच्या दारू धोरणाबाबत बातम्या वाचून वाईट वाटले. गांधीजींच्या 'गावाकडे चला...' या विचाराने प्रेरित होऊन मी माझे संपूर्ण आयुष्य गाव, समाज व देशासाठी समर्पित केले. गेली 47 वर्षे मी गावाच्या विकासासाठी व भ्रष्टाचाराविरोधात जनआंदोलन करत आहे.

राज्यात 35 जिल्ह्यांतील 252 तालुक्यांमध्ये संघटना स्थापन केली. भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक आंदोलने केली. त्यामुळे राज्यात 10 कायदे झाले. लोकपाल आंदोलनाच्या काळात तुम्ही आमच्या बरोबर आलात. तुम्ही आणि मनीष सिसोदिया यांनी राळेगणसिद्धीला अनेकदा भेटी दिल्या. आमचे काम पाहून व व्यसनमुक्तीची चळवळ पाहून तुम्हाला प्रेरणा मिळाली होती.

मात्र तुम्ही दारू संबधी केलेले धोरण मला अपेक्षित नव्हते. तुम्ही सत्ता आणि सत्तेतून पैसा या दुष्टचक्रात अडकलेले दिसतात. एका मोठ्या चळवळीतून जन्माला आलेल्या राजकीय पक्षाला हे शोभत नाही असेही पत्रात हजारे यांनी म्हटले आहे.

Anna Hazare Criticised Arvind Kejriwal
Nashik : रेशन दुकानातील धान्य काळ्या बाजारात नेतांना पकडले; मुद्देमाल ताब्यात

मला तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आपण राजकारणात गेल्यावर व मुख्यमंत्री झाल्यावर सर्व आदर्शांचा आपणास विसर पडल्याचे दिसते. आपण नवीन दारू धोरण तयार केले यातून दारू विक्रीला व मद्यपाणाला प्रोत्साहन मिळेल. रस्त्यावर दारूची दुकाने सुरू होऊन भ्रष्टाचाराला चालना मिळेल असे दिसते. जशी दारूची नशा असते, तशीच सत्तेची नशा असते त्या सत्तेच्या नशेत तुम्ही बुडाला आहात असे वाटते.

दिल्लीत 10 वर्षांपूर्वी टीम अण्णाच्या सदस्यांची बैठक झाली त्यावेळी 'आप'ने राजकीय मार्ग स्वीकारल्याची चर्चा होती. पण राजकीय पक्ष काढणे हे आमच्या आंदोलनाचे उद्दिष्ट नव्हते हे तुम्ही विसरलात. त्यावेळी टीम अण्णांबद्दल जनतेच्या मनात एक विश्वास निर्माण झाला होता.

टीम अण्णांनी देशभर फिरून जनजागृती व लोकशिक्षणाचे काम करावे असे ठरले तसे झाले नाही. दिल्ली सरकारचे नवे दारू धोरण पाहता, ऐतिहासिक चळवळीतून स्थापन झालेला पक्षही इतर पक्षांच्या मार्गावर जाऊ लागला आहे हे दुःखद आहे.

चौकट-दिल्ली राज्य सरकारने चुकिचे दारू धोरण केले ज्याचा लोकांच्या व महिलांच्या जीवनावर परिणाम होणार आहे. राजकारणात येण्यापूर्वी तुम्ही ‘स्वराज’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाचा अग्रलेख तुम्ही माझ्यासोबत लिहिला होता. 'स्वराज' नावाच्या या पुस्तकात तुम्ही ग्रामसभा, दारू धोरण याविषयी खूप छान लिहिले आहे. त्याचा तुम्हाला विसर पडला आहे याची मी तुम्हाला आठवण करून देत आहे.

Anna Hazare Criticised Arvind Kejriwal
नाशकातील संमेलनात भाजप नेत्यांची गर्दी; 'एकनाथ' मात्र एकाकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.