मंदिरे बंद करून सरकारने काय मिळवले? अण्णा हजारेंचा संतप्त सवाल

anna hazare
anna hazareGoogle
Updated on

राळेगणसिद्धी (जि. नगर) : राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे, दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडलेली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग वाढत नाही का, सात्विक विचारातून माणसे घडत आहेत, अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले, असा संतापजनक सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितीने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल, अशी ग्वाही हजारे यांनी दिली, अशी माहिती वसंत लोढा यांनी दिली.

अहमदनगर येथील मंदिर बचाव समितीने हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. या वेळी मंदिरे उघडण्यासाठी समितीने अण्णांना साकडे घातले. या वेळी मंदिर बचाव समितीचे प्रमुख वसंत लोढा, सुनील पंडित, बाळासाहेब भुजबळ, बापू ठाणगे, बाळासाहेब खताडे, गणेश पलंगे आदी उपस्थित होते.

हजारे म्हणाले की, भरकटत चालेल्या समाजाला फक्त मंदिरेच तारू शकतात, यावर माझा विश्वास आहे. मी आज जे काही आहे, ते केवळ मंदिरामधून मिळालेल्या संस्कारामुळेच आहे. आज माझे ८४ वय झाले आहे. मात्र माझ्यावर आजवर कोणताच डाग नाहीये. हा मंदिरातून मिळालेल्या संस्काराचा परिणाम आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ जाऊन तुळशीची माळ घालून वारकरी झालोय. संतांचे विचार देणारे मंदिरे का बंद केली. सरकारला संतांचे विचार काय समजले. त्यामुळे सरकाने आपले धोरण बदलून लवकर मंदिरे उघडावीत, अशा शब्दांत हजारे यांनी सरकारला सूचना केली आहे. मंदिर बचाव कृतीसमितीचे वसंत लोढा यांनी यापूर्वी झालेल्या विविध आंदोलनाची माहिती देऊन पुढील काळात अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगितले.

anna hazare
नाशिक : ४६ लाख रुपये जुगारामध्ये हरलेल्या तरुणाविरुद्ध गुन्हा
anna hazare
जनआशीर्वाद यात्रेत आरोग्यमंत्र्यांकडून कोरोना नियमांची ऐशी-तैसी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()