कोपरगाव : विजयादशमी, दीपावलीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बाजारपेठेला व व्यापाऱ्यांना चालना मिळावी या उद्देशातून तालुका व्यापारी महासंघ आणि तालुका किराणा मर्चंट असोसिएशनतर्फे ‘आपली खरेदी आपल्या कोपरगावात’ ही ग्राहक सन्मान योजना आणली.
योजनेंतर्गत ग्राहकांना लाखो रुपयांची शेकडो बक्षिसे दिली जाणार असल्याची माहिती कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे, कार्याध्यक्ष सुधीर डागा, तुलसीदास खुबानी, किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बंब यांनी दिली.
योजनेचे मुख्य प्रायोजक कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूह व सहप्रायोजक संजीवनी उद्योग समूह आहेत. या प्रसंगी प्रियदर्शनी महिला मंडळाच्या चैताली काळे, संजीवनी महिला बचत गटाच्या रेणुका कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी सुहास जगताप उपस्थित होते. चैताली काळे म्हणाल्या, तालुक्यातील नागरिकांनी सणालाच नाही, तर नेहमी स्थानिक बाजारपेठ, व्यापाऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे.
रेणुका कोल्हे म्हणाल्या, संजीवनी उद्योग समूह आणि कोल्हे कुटुंब नेहमीच स्थानिक बाजारपेठ गतिमान करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गुन्हेगारीच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. सुधीर डागा, प्रदीप साखरे यांनी ५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबरपर्यंत ही योजना सुरू आहे. १७ नोव्हेंबरला लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे आहे.
स्थानिक व्यापारी कोपरगावकरांच्या मदतीसाठी नेहमीच धावून आले. विशेषतः कोरोना काळात दिलेली ग्राहक सेवा, गरजवंताना पुरविलेली घरपोहोच भोजन डब्यांची योजना आजही समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. बस स्थानकाचे सुशोभीकरण करून व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनने महाराष्ट्रात आदर्श निर्माण केला आहे.
- काका कोयटे, अध्यक्ष, तालुका व्यापारी महासंघ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.