अहमदनगर, ता. ३०: जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये किल्लेदारांनी गड राखले. महाविकास आघाडीला ७, भाजप व शिवसेना युतीला ३, तर अपक्षांना ४ बाजार समित्या मिळाल्या. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार शंकरराव गडाख, आमदार नीलेश लंके, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकत बाजार समित्यांवर वर्चस्व सिद्ध केले.
अकोले, पाथर्डी व श्रीगोंदे येथे सत्तांतर झाले. जिल्ह्यात शुक्रवारी सात व आज (रविवारी) सात बाजार समित्यांसाठी मतदान झाले. पहिल्या टप्प्यात पारनेर, राहुरी, श्रीगोंदे, संगमनेर या तालुक्यांतील बाजार समित्यांवर महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले होते. तसेच भाजप-शिवसेनेच्या युतीने नगर तालुका, पाथर्डी येथे विजय मिळविला.
कर्जतमध्ये मात्र समसमान जागा मिळाल्या. दुसऱ्या टप्प्यात (आज) लागलेल्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला शेवगाव, अकोले, नेवासे येथे वर्चस्व राखता आले. भाजप व शिवसेना युतीने राहात्यावर वर्चस्व मिळविले. श्रीरामपूर, व कोपरगावमध्ये स्थानिक आघाड्यांनी जास्त जागा पटकाविल्या. तर जामखेडमध्ये महाविकास आघाडी व भाजप यांना समसमान जागा मिळाल्या.
राहात्यात भाजपचे नेते तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने सर्व १८ जागा जिंकल्या. शेवगावात राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व १८ जागांवर विजय मिळाला.
नेवासे तालुक्यात शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाने सर्व १८ जागा जिंकल्या. कोपरगाव बाजार समितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्त्वाखाली काळे, कोल्हे, परजणे यांच्या गटाचा सर्व १८ जागांवर विजय मिळविला.
अकोले तालुक्यात महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या. भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या गटाला ७ जागांवर समाधान मानावे लागले. श्रीरामपूर येथे डॉ. सुजय विखे पाटील, करण ससाणे गट, माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या यांच्या श्रीरामपूर सहकार विकास पॅनेलला १७ जागा मिळाल्या. एक जागा अपक्षाला मिळाली.
समित्यांवरील बलाबल
अहमदनगर जिल्ह्यातील एकूण बाजार समित्या - १४
महाविकास आघाडी - ७
भाजप व शिवसेना - ३
अपक्ष (संमिश्र) २
महाविकास आघाडी व भाजप समसमान- २
निकालाचे वैशिष्ट्य
राहात्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाने सर्व जागा जिंकल्या.
शेवगावात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व १८ जागांवर विजय
नेवासे तालुक्यात आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाने सर्व १८ जागा जिंकल्या.
कोपरगाव बाजार समितीत आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्त्वाखाली काळे, कोल्हे, परजने यांच्या गटाचा सर्व १८ जागांवर विजय
अकोले तालुक्यात महाविकास आघाडीला ११ जागा मिळाल्या. भाजपचे माजी आमदार वैभव पिचड यांच्या गटाला ७ जागांवर समाधान मानावे लागले.
श्रीरामपूर येथे डॉ. सुजय विखे पाटील, करण ससाणे गट, माजी आमदार भानुदास मुरकुटे गटाच्या यांच्या श्रीरामपूर सहकार विकास पॅनेलला १७ जागा मिळाल्या. १ अपक्ष
जामखेड येथे भाजप व महाविकास आघाडी समसमान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.