नगर तालुका : प्रेमासाठी माणूस वाट्टेल ते करायला तयार होतो प्रेयसीने 'जर तुला सरकारी नोकरी लागली, तरच मी लग्न करेल नाहीतर आपलं प्रेम प्रकरण बंद ' असा मुलीने गर्भित इशारा दिला आणि नगर जिल्ह्यातील लोणी येथे राहणाऱ्या तिच्या प्रियकराला सरकारी नोकरी तर नव्हती, मग त्याने वेगळीच शक्कल लढवली त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी महेश जगताप रा. लोणी (वय २१ ) आणी संबंधित मुलगी हे एका खाजगी संस्थेमध्ये काम करत होते, त्या दोघांचे तेव्हापासून प्रेम प्रकरण होते. तुला जर माझ्याशी लग्न करायचे असेल तर सरकारी नोकरी लागली तरच मी तुझ्या बरोबर लग्न करेल, नाही तर हे प्रेम प्रकरण आपले इथेच थांबेल असा गर्भित इशारा तिने त्या मुलाला दिला होता. महेश याने त्या मुलीला व्हॉट्सअॅप, फेसबुक च्या माध्यमातून संपर्क साधला. ते दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात राहत होते.
महेश याला त्याच मुलीशी लग्न करायचे असल्यामुळे त्याने शक्कल लढवली, लष्कराचा गणवेश शिवला तसेच त्या गणवेशावर मेजर म्हणून स्वतःचे नाव टाकले. त्याच्या गणवेशातील आपला फोटो त्याने त्या मुलीला पाठवला. संबंधित मुलीने तू लष्करात केव्हा नोकरीला लागला याची विचारणा करून तू ज्या ठिकाणी लष्करामध्ये नोकरी करतो त्या ठिकाणचे मला फोटो पाठव, तसेच तुझा तेथे कशा पद्धतीने सराव होतो, तेथे तू काय काम करतो हे मला लाईव्ह दाखव तरच मला तुझी खात्री पटेल. असे तीने त्याला सांगितले होते.
मग काल दुपारच्या सुमारास महेश हा लष्कराचा गणवेश घालून लष्कराच्या हद्दीमधील सोलापूर रस्ता, जामखेड रस्ता व किल्ला परिसरात गेला. त्या ठिकाणी गेल्यावर तेथील लष्कराच्या सिक्युरिटी गार्ड यांनी त्याची विचारपूस करायला सुरुवात केली. मी एम आय आरसी मध्ये असतो अशी वेगवेगळ्या प्रकारची माहिती द्यायला सुरुवात केली. ज्या वेळेला तेथील कार्यरत असलेल्या जवानांनी त्याच्याकडचे ओळखपत्र तपासले, ओळखपत्र बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला, तसे त्याने नोकरी मिळवण्यासाठी चे काही पत्र करायचे होते ते सुद्धा त्याने कॉम्प्युटरच्या माध्यमातून डुप्लिकेट सही करून आपण नोकरीला लागलो असल्याचे पत्र त्याने स्वतः तयार केलेले होते.
हेल्मेटने केला घोळ..
साधारणतः संरक्षण विभागातील कर्मचारी कामानिमीत्त बाहेर पडताना आपल्या डोक्यात हेल्मेट कंपलसरी वापरतो. मात्र महेश हा फक्त लष्करी गणेवेशावर फिरत होता. याचे संशयास्पद फिरणे मिल्ट्री इंटीलिजेन्सच्या टिम (गुप्रचर विभाग )च्या लक्षात आले. त्यांनी त्याचा जामखेड रस्त्यावरून किल्ला दरवाजा प्रर्यंत छुपा फाठलाग केला. आपल्या टिमला सतर्क करून त्याला ताब्यात घेऊन चौकशी करताना त्याचे बनावट ओळखपत्र व इतर कागदपत्रे तपासले तसेच लष्करामध्ये मला नोकरी लागली आहे असे भासवून लष्कराच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्याचा प्रकार केल्याबद्दल लष्कराच्या गुप्तचर विभागाच्या जवानांनी पोलिसांच्या हवाली केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.